Panjabrao Dakh Havaman Andaj : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. ही बातमी आहे पावसा संदर्भात. ऑक्टोबर महिन्यात महाराष्ट्रात पाऊसमान कसे राहणार, कोणकोणत्या तारखांना पाऊस पडणार? या संदर्भात ज्येष्ठ हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी एक सविस्तर हवामान अंदाज जारी केला आहे.
पंजाब रावांनी वर्तवलेल्या सुधारित हवामान अंदाजानुसार आज पासून अर्थातच 28 सप्टेंबर पासून ते 5 ऑक्टोबर दरम्यान महाराष्ट्रातील काही भागांमधून पावसाचा जोर कमी होणार आहे. या काळात राज्यातील बहुतांशी भागात पावसाचे प्रमाण कमी राहणार आहे.
फक्त विखुरलेल्या स्वरूपाचा पाऊस पडणार आहे. म्हणजेच सर्व दूर पाऊस पडणार नाही. यामुळे हा काळ सोयाबीन हार्वेस्टिंगसाठी सर्वात परफेक्ट ठरणार आहे. म्हणून ज्या शेतकऱ्यांचे सोयाबीन काढणीसाठी तयार झाले असेल त्यांनी या काळात आपले सोयाबीन काढून घ्यावे असे आवाहन जाणकार लोकांनी केले आहे.
पंजाब रावांनी देखील या काळात शेतकऱ्यांनी आपल्या सोयाबीनची कापणी करून जर मशीन मिळत असेल तर लगेचच मशीन मधून सोयाबीन काढून त्याची सुरक्षित ठिकाणी साठवणूक करून घ्यावी असा सल्ला दिला आहे. तथापि आज पासून पुढील तीन दिवस म्हणजेच 28, 29 आणि 30 सप्टेंबर रोजी राज्यातील उत्तर महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे.
उत्तर महाराष्ट्र अर्थातच नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव या जिल्ह्यांमध्ये पुढील तीन दिवस पाऊस मुक्कामी राहणार आहे. म्हणजेच या भागात पावसाची तीव्रता इतर भागांपेक्षा अधिक राहणार आहे. पण एक ऑक्टोबर पासून येथीलही पावसाचा जोर कमी होणार आहे.
या भागातही एक ऑक्टोबर पासून सूर्य दर्शनाला सुरुवात होणार आहे. यामुळे एक ऑक्टोबर नंतर या भागातील शेतकरी बांधव देखील आपल्या खरीप हंगामातील पिकांची हार्वेस्टिंग करू शकतात. दरम्यान पंजाब रावांनी ६ ऑक्टोबर नंतर महाराष्ट्रातील वातावरण बदलेलं आणि सहा ते नऊ ऑक्टोबर दरम्यान राज्यात चांगला मुसळधार पाऊस होईल असा अंदाजही दिला आहे.
5 ऑक्टोबर नंतर महाराष्ट्रात पावसासाठी पोषक परिस्थिती तयार होणार आहे आणि त्यानंतर पुढील चार दिवस म्हणजेच सहा, सात, आठ आणि नऊ ऑक्टोबर रोजी महाराष्ट्रातील बहुतांशी जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. ऑक्टोबर महिन्याच्या शेवटीही राज्यात जोरदार पावसाचा अंदाज देण्यात आला आहे.
23 ऑक्टोबर, 24 ऑक्टोबर आणि 25 ऑक्टोबरला महाराष्ट्रातील काही भागांमध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस पडणार असा अंदाज पंजाब रावांनी दिला असून यावर्षी पाच नोव्हेंबर पासून महाराष्ट्रात थंडीला सुरुवात होणार असे भाकित त्यांनी वर्तवले आहे.