Panjabrao Dakh Mobile Number : भारतीय शेती ही सर्वस्वी पावसाच्या पाण्यावर आधारित आहे. अशा परिस्थितीत मान्सूनचा अंदाज शेतकऱ्यांसाठी अति महत्त्वाचा ठरतो. मान्सूनच्या अंदाजावर, हवामान अंदाजावरच शेतीची कामे शेतकऱ्यांना योग्य पद्धतीने करता येतात. याच पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना हवामानाचा अंदाज पोहोचवण्यासाठी भारतीय हवामान विभागाच्या माध्यमातून प्रयत्न सुरूच असतात. दरम्यान परभणी येथील पंजाबराव डख हे देखील हवामान अंदाज शेतकऱ्यांना सांगत असतात.
यांसाठी त्यांनी व्हाट्सअप आणि युट्युब चा वापर सुरू केला आहे. Whatsapp आणि youtube च्या माध्यमातून पंजाबराव डख यांचा हवामान अंदाज लाखो शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवला जातो. विशेष बाब अशी की पंजाबरावांचा हवामान अंदाज तंतोतंत खरा ठरत असल्याचा दावा शेतकरी तसेच डख स्वतः करतात.
पंजाब रावांचा हवामान अंदाज खरा ठरत असल्याने याचा शेतकऱ्यांना फायदा होत असून पंजाबरावांच्या बाबतीत शेतकऱ्यांना जाणून घेण्याची उत्सुकता देखील शीगेला पोहचली आहे. दरम्यान आज आपण पंजाबरावांनी मान्सून 2023 कसा राहील याबाबत दिलेली माहिती जाणून घेणार आहोत तसेच पंजाबरावांच्या जीवनाविषयी थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
पंजाबरावं डख यांनी वर्तवलेल्या हवामान अंदाजानुसार मान्सून 2023 समाधानकारक राहणार आहे. गेल्यावर्षीप्रमाणेच यंदा देखील चांगला पावसाळा राहील आणि यामुळे शेतकऱ्यांना निश्चितच फायदा होणार आहे. डख यांच्या मते, 8 जून रोजी यंदा महाराष्ट्रात मान्सूनचे आगमन ठरलेले आहे. तसेच आगमनानंतर 22 जून पर्यंत मान्सून संपूर्ण महाराष्ट्र व्यापणार आहे. डक यांच्या मते जीवन अखेर जवळपास राज्यातील सर्वच शेतकऱ्यांची सोयाबीन पेरणी होऊन जाईल.
ज्या शेतकऱ्यांची जून महिन्यात पेरणी होणार नाही त्या शेतकऱ्यांची जुलै महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात पेरणी होऊन जाईल असा दावा त्यांनी केला आहे. डख यांनी दिलेल्या अधिकच्या माहितीनुसार जून पेक्षा जुलै महिन्यात आणि जुलैपेक्षा ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर महिन्यात या पान्सूनमध्ये अधिक पाऊस राहणार आहे. एवढेच नाही तर यंदा दिवाळीतही पाऊस पडणार आहे. यंदा दिवाळीत म्हणजेच नोव्हेंबर महिन्यात पावसाची शक्यता आहे. एकंदरीत डक यांनी यावर्षी चांगला मान्सून राहील असा अंदाज बांधला आहे.
आम्ही आपणास सांगू इच्छितो की, डक यांनी 2022 च्या मान्सून बाबत जी भविष्यवाणी केली होती ती अगदी तंतोतंत खरी ठरली होती. दरम्यान याही वर्षी त्यांनी मान्सून समाधानकारक राहणार असल्याचा अंदाज बांधला आहे. यामुळे यावर्षीचा मान्सून कसा राहतो याकडे विशेष लक्ष शेतकऱ्यांचे सामान्य जनतेचे राहणार आहे. दरम्यान आज आपण पंजाबराव यांच्या विषयी थोडक्यात जाणून घेणार आहोत. पंजाबराव हे परभणी जिल्ह्यातील गुगळी धामणगाव या गावात वास्तव्यास आहेत. त्यांना अगदी लहानपणापासूनच हवामान अंदाज ऐकण्याची सवय होती आणि हवामानात होणाऱ्या बदलांची माहिती जाणून घेण्याची उत्सुकता होती.
याच उत्सुकतेच्या पोटी त्यांनी हवामानाचा अभ्यास केला, नैसर्गिक संकेतांचा अभ्यास केला, उपग्रहाचा अभ्यास केला आणि हवामान अंदाज सांगण्यास सुरुवात केली. त्यांनी सुरुवातीला आपल्या गावात व आजूबाजूच्या परिसरात कसं हवामान राहील याचा अंदाज गावकऱ्यांना तसेच परिसरातील शेतकऱ्यांना सांगण्यास सुरुवात केली. त्यांचा अंदाज तंतोतंत खरा ठरवू लागल्याने परिसरातील शेतकऱ्यांनी त्यांच्या अंदाजावरच अधिक विश्वास ठेवला. हळूहळू त्यांची लोकप्रियता वाढत गेली आणि आता ते संपूर्ण राज्यात, राज्यातच नव्हे तर आजूबाजूच्या राज्यातील शेतकऱ्यांसाठी देखील हवामान अंदाज सांगत असतात.
काही मीडिया रिपोर्ट्स मध्ये दिलेल्या माहितीनुसार, पंजाब डख यांनी बॅचलर ऑफ आर्ट्स म्हणजेच बीएपर्यंतचे शिक्षण घेतले आहे. शिक्षणानंतर काही काळ त्यांनी अंशकालीन शिक्षक म्हणूनही काम केले आहे. त्यांना हवामानाची आवड असल्याने त्यांनी उपग्रहाचा अभ्यास केला आहे. ईटीडी आणि सीटीसी कोर्स त्यांनी केला असल्याची माहिती काही मीडिया रिपोर्ट्स मध्ये देण्यात आली आहे.
डक केवळ हवामान अंदाज वर्तवतात असे नाही तर ते एक प्रयोगशील शेतकरी देखील आहेत. त्यांच्याकडे वडीलोपार्जित दहा एकर शेत जमीन असून ते आपल्या जमिनीत हरभरा आणि सोयाबीन पिकाची शेती करतात. विशेष बाब अशी की शेतीतून त्यांना चांगले दर्जेदार उत्पादन देखील मिळते. हेच कारण आहे की हवामान अंदाजासोबतच ते शेतकऱ्यांना शेतीविषयक सल्ला देखील देत असतात. त्यांच्या सल्ल्याचा शेतकऱ्यांना फायदा देखील होत आहे.
9158101052 हा पंजाबराव डख यांचा मोबाईल क्रमांक आहे. पंजाबराव डख यांच्या अधिकृत youtube चैनल वर हा मोबाईल क्रमांक नमूद करण्यात आलेला आहे. https://youtu.be/mfYntx7FHtI आपण या लिंकवर क्लिक करून पंजाबराव डख यांच्या अधिकृत यूट्यूब चैनलला भेट देऊ शकता.