Panjabrao Dakh : जेष्ठ हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांचा एक नवीन हवामान अंदाज समोर आला आहे. पंजाबरावांनी आपल्या नवीन हवामान अंदाजात आजपासून पुढील काही दिवस महाराष्ट्रात पावसाची शक्यता जाणवत असल्याचे स्पष्ट केले आहे.
डख यांनी सांगितल्याप्रमाणे, आज 16 ऑक्टोबर पासून ते 18 ऑक्टोबर पर्यंत महाराष्ट्रातील नांदेड, लातूर, परभणी, धाराशिव, बीड, अहिल्यानगर, सातारा, सांगली, कोल्हापूर, कोकणपट्टी, पश्चिम महाराष्ट्र, नाशिक, संभाजीनगर, जालना या भागात भाग बदलत तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे.
अर्थातच हे तीन दिवस महाराष्ट्रात पावसाची तीव्रता फार अधिक राहणार नाही. भाग बदलत तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. या काळात अगदीच किरकोळ पाऊस पडणार असे जाणवते. मात्र 19 ऑक्टोबर पासून महाराष्ट्रातील पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.
19 ऑक्टोबर ते 21 ऑक्टोबर दरम्यान महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पंजाब रावांनी मानसून जाता-जाता महाराष्ट्राला चांगलाच झोडपून काढणार असे म्हटले आहे.
यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या शेती पिकांची विशेष काळजी घ्यावी असे आवाहन केले जात आहे. हा पाऊस खरीप हंगामातील पिकांसाठी जेवढा घातक ठरणार आहे तेवढाच रब्बी हंगामातील पिकांसाठी फायदेशीर ठरणार असा विश्वास पंजाबरावांनी यावेळी वर्तवला आहे.
पंजाब रावांनी 19 ऑक्टोबर ते 21 ऑक्टोबर दरम्यान राज्यातील यवतमाळ, नांदेड, हिंगोली, वाशिम, अकोला, अमरावती, बुलढाणा, परभणी, लातूर, धाराशिव, बीड, जालना, जळगाव, संभाजीनगर, अहिल्यानगर, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, कोकण किनारपट्टी, नाशिक या भागात भाग बदलत मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. या काळात पावसाचा जोर अधिक राहणार आहे.
जाता जाता मान्सून महाराष्ट्राला चांगलाच झोडपणार आहे. तथापि या काळात नंदुरबार आणि धुळे या जिल्ह्यांमध्ये पावसाची तीव्रता कमी राहण्याची शक्यता आहे. दुसरीकडे पंजाब रावांनी 22 ऑक्टोबरला उत्तर महाराष्ट्रातून मान्सून निघून जाईल असे म्हटले आहे.
23 ऑक्टोबरला मराठवाड्यातून मान्सून माघारी फिरणार आणि 24 ऑक्टोबरला संपूर्ण राज्यातून मान्सून माघारी फिरून जाईल असा मोठा दावा पंजाब रावांनी या आपल्या नवीन हवामान अंदाजात केला आहे.
खरे तर हवामान खात्याने मान्सून महाराष्ट्रासहित देशातून माघारी फिरला असल्याची घोषणा नुकतीच केली आहे. दुसरीकडे पंजाब रावांनी 24 ऑक्टोबर पर्यंत महाराष्ट्रातून मान्सून निघून जाईल असा दावा यावेळी केला आहे.