Panjabrao Dakh Navin Havaman Andaj : पंजाबरावांचा नवीन हवामान अंदाज समोर आला आहे. खरे तर भारतीय हवामान खात्याने महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसासाठी पोषक परिस्थिती तयार होत असल्याचा अंदाज दिलाये. हवामान खात्याने आज राज्यातील जवळपास दहा जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवली आहे.
हवामान खात्याच्या अंदाजानुसार आज रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात पावसाची शक्यता असून या संबंधित पाच जिल्ह्यांना आज येलो अलर्ट देखील जारी करण्यात आला आहे. दुसरीकडे रायगड, पुणे, धाराशिव, सोलापूर आणि लातूर या जिल्ह्यांमध्येही आज तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज देण्यात आला आहे.
मात्र या जिल्ह्यांना हवामान खात्याने कोणताच अलर्ट दिलेला नाही. म्हणजेच येथे पाऊस झाला तरी पावसाची तीव्रता फारशी अधिक राहणार नाही. दरम्यान भारतीय हवामान खात्यानंतर आता जेष्ठ हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी सुद्धा एक अंदाज जारी केला आहे.
पंजाब रावांनी दिलेल्या माहितीनुसार आज पासून म्हणजेच 15 नोव्हेंबर पासून ते पुढील तीन दिवस महाराष्ट्रात पावसासाठी पोषक परिस्थिती राहणार आहे. 15 नोव्हेंबर ते 17 नोव्हेंबर दरम्यान त्यांनी पावसाची शक्यता वर्तवली आहे.
या काळात राज्यातील अक्कलकोट, सोलापूर, जत, तासगाव, इस्लामपूर, सांगली, श्रीगोंदा, पुणे, कोल्हापूर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग म्हणजेच कोकण किनारपट्टी या भागात पावसाची शक्यता असल्याचा अंदाज पंजाबरावांनी यावेळी जाहीर केला आहे.
या काळात कर्नाटकात जास्त पाऊस पडणार असेही पंजाबरावांनी स्पष्ट केले आहे. उर्वरित राज्यात मात्र फक्त ढगाळ हवामान पाहायला मिळणार आहे, पाऊस काही पडणार नाही यामुळे उर्वरित राज्यातील शेतकऱ्यांनी चिंता करू नये असेही यावेळी पंजाबरावांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
आम्ही आपणास सांगू इच्छितो की, महाराष्ट्रात सध्या विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. राज्यातील विधानसभा निवडणुकांसाठी येत्या 20 तारखेला म्हणजेच 20 नोव्हेंबरला मतदान होणार आहे. यामुळे मतदानाच्या दिवशी महाराष्ट्रातील हवामान कसे राहणार असाही प्रश्न अनेकांच्या माध्यमातून उपस्थित केला जात होता.
दरम्यान याच संदर्भात माहिती देताना पंजाब रावांनी 20 तारखेला म्हणजेच मतदानाच्या दिवशी महाराष्ट्रातील हवामान प्रामुख्याने कोरडे राहील असे म्हटले आहे. मतदानाच्या दिवशी महाराष्ट्रात कुठेच पाऊस पडणार नाही कोणीही चिंता करू नये असे पंजाबरावांनी सांगितले आहे. राज्यात 15 नोव्हेंबर ते 17 नोव्हेंबर या काळात काही भागांमध्ये पावसाची शक्यता आहे.
वर सांगितलेल्या भागात या कालावधीमध्ये पाऊस पडेल मात्र 17 तारखे नंतर अर्थातच 18 नोव्हेंबर पासून महाराष्ट्रात पुन्हा एकदा थंडी सक्रिय होणार आहे. 18 नोव्हेंबर पासून महाराष्ट्रात थंडीची तीव्रता वाढणार असल्याचा अंदाज पंजाबरावांच्या माध्यमातून यावेळी सार्वजनिक करण्यात आला आहे.