Panjabrao Dakh News : राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी हाती येत आहे. आता पाऊस रजा घेण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर येतेय. खरे तर गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात पावसाने मोठा धुमाकूळ घातलाय. हवामान खात्याने मान्सून कधीच महाराष्ट्रातून हद्द बाहेर झाला असल्याचे जाहीर केले आहे.
मात्र अजूनही राज्यातील काही भागात पाऊस सुरूचं असल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. अशातच आता पंजाब रावांनी एक नवीन हवामान अंदाज जारी केला आहे. पंजाब रावांच्या मते आता 24 तारखेपासून महाराष्ट्रात सूर्य दर्शनाला सुरुवात होणार आहे.
24 ऑक्टोबरला मान्सून महाराष्ट्राचा निरोप घेणार आहे. तत्पूर्वी राज्यात काही दिवस जोरदार पावसाची शक्यता आहे. आज राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
आज राज्यातील यवतमाळ, नांदेड, हिंगोली, वाशिम, अकोला, अमरावती, बुलढाणा, परभणी, लातूर, धाराशिव, बीड, जालना, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, कोकण, नाशिक या भागात पावसाची शक्यता आहे.
आज नंदुरबार आणि धुळे या उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये पावसाचे प्रमाण कमी राहणार आहे. तसेच 22 ऑक्टोबरला अर्थातच उद्या उत्तर महाराष्ट्रातून, 23 ऑक्टोबरला मराठवाड्यातून आणि 24 ऑक्टोबरला संपूर्ण महाराष्ट्रातून मान्सून माघारी फिरणार असा अंदाज पंजाब रावांनी दिला आहे.
अर्थात 24 तारखेनंतर महाराष्ट्रातून मान्सून माघारी फिरेल आणि सूर्य दर्शनाला सुरुवात होईल असे पंजाब रावांचे म्हणणे आहे. पण, पंजाब रावांनी आपल्या कालच्या हवामान अंदाजात राज्यात 22 आणि 23 ऑक्टोबरला देखील जोरदार पाऊस पडणार असे म्हटले आहे.
या काळात दुपारी कडक ऊन पडेल आणि सायंकाळी तसेच रात्रीच्या दरम्यान पाऊस पडणार असे पंजाबरावांचे म्हणणे आहे. दरम्यान, 24 तारखेला राज्यात धुके पडणार आणि त्यानंतर 25 ऑक्टोबर पासून महाराष्ट्रात थंडीला सुरुवात होण्याची शक्यता आहे.
परंतु कडाक्याची थंडी ही पाच नोव्हेंबर पासूनच पडेल. पाच नोव्हेंबर पासून थंडीची तीव्रता वाढणार असून सध्याचा काळ हा रब्बी हंगामातील पिकांच्या पेरणीसाठी सर्वोत्कृष्ट असल्याचा दावा पंजाबरावांनी केलाय.