Panjabrao Dakh News : राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. पंजाब रावांनी महाराष्ट्रात 20 डिसेंबर नंतर पुन्हा एकदा पावसाची शक्यता वर्तवली आहे. पंजाबरावांनी सांगितल्याप्रमाणे, राज्यात 20 डिसेंबर पर्यंत कडाक्याची थंडी पडणार आहे.
थंडीची तीव्र लाट आपल्या महाराष्ट्रात पाहायला मिळणार आणि दिवसा सुद्धा स्वेटर घालावे लागणार अशी परिस्थिती आगामी काही दिवस कायम राहणार आहे. या तीव्र थंडीचा कांदा आणि रब्बी हंगामातील पिकांना फायदा होणार आहे.
दुसरीकडे, सध्याचे हवामान हे कांदा काढण्यासाठी सुद्धा पोषक असून या काळात शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त कांदा काढणी करून सुरक्षित ठिकाणी कांदा साठवून ठेवावा.
कारण की, 20 डिसेंबर नंतर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये वातावरण खराब होऊन पावसाची शक्यता आहे असा अंदाज पंजाब रावांनी दिला आहे.
पंजाब रावांनी सांगितल्याप्रमाणे, राज्यातील लातूर, बीड, धाराशिव, अहिल्यानगर, सोलापूर, परभणी, सांगली, सातारा, कोल्हापूर या भागात 20 डिसेंबर नंतर हवामान बिघडणार आहे. नाशिक पर्यंत हवामान खराब होऊ शकतो.
म्हणजेच 20 तारखे नंतर या संबंधित भागांमध्ये पावसाची शक्यता आहे. यामुळे शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घेऊन या आधीच आपल्या कांदा पिकाची काढणी पूर्ण करून घ्यावी, असा सल्ला यावेळी पंजाबरावांच्या माध्यमातून देण्यात आला आहे.
तसेच ज्या भाविकांना तिरुपतीला दर्शनासाठी जायचे असेल त्यांच्यासाठीही पंजाब रावांनी एक महत्त्वाची माहिती दिली आहे. पंजाबरावांनी 13 ते 14 डिसेंबर दरम्यान तामिळनाडूमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे.
त्यामुळे जे लोक तिरुपतीला दर्शनासाठी जाणार असतील त्यांनी या काळात विशेष काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे. दुसरीकडे, 16 ते 18 डिसेंबर दरम्यानही तामिळनाडूत मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
महत्त्वाचे म्हणजे या काळात तामिळनाडूत पावसाची तीव्रता वाढली तर याचाच प्रभाव हा आपल्या महाराष्ट्रावर पाहायला मिळणार आहे आणि राज्यात 20 तारखेनंतर हवामान बिघडणार आहे असेही पंजाब रावांनी आपल्या हवामान अंदाजात यावेळी स्पष्ट केले आहे.