Panjabrao Dakh News : महाराष्ट्रात सध्या हवामानात मोठा बिघाड झाला आहे. राज्यातील बहुतांशी जिल्ह्यात ढगाळ हवामान पाहायला मिळत आहे. अहमदनगर जिल्ह्यात मात्र अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. जिल्ह्यातील कर्जत, नेवासा, राहुरी तालुक्यात मंगळवारी रात्री पावसाची हजेरी होती तसेच बुधवारी पहाटे देखील रिमझिम स्वरूपाचा पाऊस कोसळला आहे.
या पावसामुळे मात्र जिल्ह्यातील शेती पिकांना मोठा फटका बसला आहे. ऐन वाढीच्या अवस्थेत असलेल्या या पिकांवर रोगराईचे सावट येऊ शकते अशी भीती आता शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे राहुरी तालुक्यातील वांबोरी, सडे, कात्रड व परिसरात चक्क गारपीट झाली आहे.
याशिवाय नेवासा तालुक्यातील सोनई, चांदा व घोडेगाव परिसरात अवकाळी पावसाने नुकसान झालं आहे. घोडेगावात ऐन हिवाळ्यात 24 मिमी पावसाची नोंद झाली आहे. दरम्यान आपल्या हवामान अंदाज यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातिल परिचित व्यक्तिमत्व पंजाबराव डख यांनी गेल्या काही दिवसांपूर्वीच आपल्या हवामान अंदाजात हा अंदाज वर्तवला होता.
पंजाबराव डख यांनी वर्तवलेल्या आपल्या हवामान अंदाजानुसार 25 जानेवारी रोजी नाशिक सह आजूबाजूच्या जिल्ह्यात ढगाळ हवामान राहील तसेच तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली होती. याशिवाय 26 जानेवारी ते 28 जानेवारी दरम्यान मराठवाडा आणि विदर्भात पावसाची शक्यता असल्याचे पंजाबरावांनी सांगितलं आहे. 26 ते 28 जानेवारी दरम्यान पूर्व विदर्भात विशेष पावसाची शक्यता आहे.
नागपूर वर्धा गडचिरोली यवतमाळ हिंगोली परभणी नांदेड अकोला अमरावती वाशिम या जिल्ह्यात अवकाळी पावसाची शक्यता त्यांनी वर्तवली आहे. राज्यातील इतर भागात जरी हवामान कोरडं असलं तरी देखील तुरळक ठिकाणी पाऊस कोसळू शकतो असे देखील त्यांनी नमूद केला आहे. म्हणजेच राज्यातील इतरही भागात ढगाळ हवामान आणि तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता त्यांच्याकडून वर्तवण्यात आली आहे.
निश्चितच ऐन हिवाळ्यात कोसळणारा हा पाऊस शेती पिकांसाठी घातक ठरत असून पंजाबराव डख यांनी 30 जानेवारी रोजी राज्यात धुके मोठ्या प्रमाणात येणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे. याचा देखील शेती पिकांना फटका बसणार असून यासाठी योग्य त्या उपाययोजना शेतकऱ्यांना करणे गरजेचे ठरणार आहे.
शिवाय फेब्रुवारीच्या सुरुवातीला राज्यात मोठ्या प्रमाणात थंडीचा जोर वाढणार आहे. फेब्रुवारीतील पहिल्या आठवड्याच्या शेवटी देखील राज्यात ढगाळ हवामान तयार होऊ शकतं असा एक प्राथमिक स्वरूपाचा अंदाज देखील त्यांनी बांधला असून याबाबत डिटेल अंदाज येत्या काही दिवसात ते सार्वजनिक करणार आहेत.