Panjabrao Dakh News : राज्यातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची आणि मोठी कामाची बातमी समोर येत आहे. हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी एक नवीन हवामान अंदाज जारी केला आहे. खरंतर सध्या सोयाबीन, उडीद, मूग तसेच कापूस पीक अंतिम टप्प्यात आले आहे. येत्या काही दिवसांनी या पिकाची हार्वेस्टिंग सुरू होणार आहे.
सप्टेंबरच्या अखेरीस खरिपातील बहुतांशी पिकांची हार्वेस्टिंग सुरू होईल अशी शक्यता आहे. दरम्यान, याच साऱ्या पार्श्वभूमीवर पंजाबरावांनी आगामी काही दिवस महाराष्ट्रातील हवामान कसे राहणार, कोणत्या तारखेपासून पाऊस विश्रांती घेणार या संदर्भात सविस्तर अशी माहिती दिली आहे.
कसं राहणार राज्यातील हवामान?
पंजाबरावांनी सांगितल्याप्रमाणे महाराष्ट्रात 9 सप्टेंबर पर्यंत पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र अन पश्चिम महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी म्हणजेच भाग बदलत पाऊस पडण्याची शक्यता आहे.
या भागात आज आणि उद्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसंच 9 सप्टेंबर पासून ते 14 सप्टेंबर पर्यंत राज्यातील अमरावती, वर्धा, अकोला, बुलढाणा, यवतमाळ, हिंगोली, जालना, परभणी, बीड, छत्रपती संभाजी नगर, जळगाव या भागात भाग बदलत पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
उत्तर महाराष्ट्र बाबत बोलायचं झालं तर या भागातील धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, अहमदनगर या जिल्ह्यांमध्ये 13 सप्टेंबर ते 15 सप्टेंबर दरम्यान अगदीच जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. पण, 15 सप्टेंबर नंतर राज्यातील पावसाचा जोर ओसरणार आहे आणि पाऊस विश्रांती घेणार आहे.
पश्चिम महाराष्ट्रातून तर दहा तारखेनंतरच पाऊस गायब होणार आहे. पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, सोलापूर या भागात दहा तारखेपासून पाऊस विश्रांतीवर जाणार असा अंदाज आहे.
विदर्भातही 14 सप्टेंबर नंतर पावसाची विश्रांती पाहायला मिळणार आहे. यामुळे जे शेतकरी बांधव येत्या काही दिवसांत सोयाबीन, उडीद, मूग, कापूस अशा पिकांची हार्वेस्टिंग करतील त्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.