Panjabrao Dakh News : जेष्ठ हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांचा हवामान अंदाज पुन्हा एकदा खरा ठरला आहे. राज्यात गेल्या दोन-तीन दिवसांपासून पाऊस सुरू झाला आहे. नाशिक, अहमदनगर, पुणे, कोकण, मुंबई सह राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम आणि काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस सुरू आहे. अहमदनगर जिल्ह्यात पावसाची तीव्रता सर्वाधिक पाहायला मिळाली.
आम्ही आपणास सांगू इच्छितो की पंजाबराव डख यांनी नुकत्याच काही दिवसांपूर्वी एक हवामान अंदाज जारी केला होता. या हवामान अंदाजात पंजाबरावांनी 21 सप्टेंबर पासून महाराष्ट्रात पावसाला सुरुवात होणार असे म्हटले होते. यानुसार राज्यात 21 सप्टेंबर पासून पाऊस सक्रिय झाला असून सर्व दूर हलका ते मध्यम पाऊस बरसत आहे.
तसेच काही भागात जोरदार स्वरूपाचा पाऊस झाला आहे. यामुळे पुन्हा एकदा पंजाब रावांचा हवामान अंदाज खरा ठरला अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. दरम्यान आज आपण पंजाब रावांनी महाराष्ट्रात आणखी किती दिवस जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे या संदर्भात थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
महाराष्ट्रात आणखी किती दिवस पाऊस पडणार?
पंजाब रावांनी वर्तवलेल्या सुधारित हवामान अंदाजानुसार, महाराष्ट्रात गांधी जयंती पर्यंत म्हणजेच 2 ऑक्टोबर पर्यंत मुसळधार पावसाची शक्यता आहे. अर्थातच राज्यात आणखी आठ दिवस जोरदार पावसाची शक्यता आहे.
आज आणि उद्या राज्यातील विदर्भ विभागात विखुरलेला पाऊस पडण्याची शक्यता आहे. मात्र मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, कोकण, मुंबई या भागात जोरदार पावसाचा अंदाज देण्यात आला आहे.
महत्त्वाचे म्हणजे यातील काही भागात अतिवृष्टी सारखा पाऊस होण्याची देखील शक्यता आहे. नाशिक, मुंबई, ठाणे, पुणे, कोकण, छत्रपती संभाजी नगर, मालेगाव, सातारा, सांगली, कोल्हापूर या भागात अतिवृष्टी सारखा पाऊस होऊ शकतो असे भाकीत सांगितलं गेलं आहे.
विदर्भ विभागातील अकरा जिल्ह्यांमध्ये आज आणि उद्या विखुरलेला स्वरूपाचा पाऊस पडणार तर दुसरीकडे नांदेड, लातूर,बीड, उस्मानाबाद, परभणी, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, पुणे, कोकण, मुंबई आणि उत्तर महाराष्ट्रात म्हणजेच नाशिक, अहमदनगर, धुळे, नंदुरबार, जळगाव या भागात हे दोन दिवस भाग बदलत जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
सर्वाधिक पाऊस हा उत्तर महाराष्ट्रात पाहायला मिळू शकतो म्हणजेच नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव , अहमदनगर या भागात पावसाची तीव्रता अधिक राहणार असा अंदाज पंजाब रावांनी दिला आहे.
महत्त्वाची बाब अशी की 26 सप्टेंबर नंतर देखील राज्यात पाऊस सुरूच राहणार आहे. राज्यात जवळपास 2 ऑक्टोबर पर्यंत पाऊस सुरू राहील असा अंदाज पंजाब रावांनी दिला आहे. या काळात महाराष्ट्रातील प्रत्येक गावात तीन-तीन दिवस पाऊस पडणार आहे.
आज पासून अर्थातच 25 सप्टेंबर पासून ते 27 सप्टेंबर पर्यंत नाशिककडे तुफान पाऊस पडण्याची शक्यता आहे. जोरदार पाऊस होणार आणि यामुळे राज्यातील काही प्रमुख धरणे भरतील असा अंदाज आहे.