Panjabrao Dakh News : ज्येष्ठ हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांचा एक नवीन अंदाज समोर आला आहे. पंजाब रावांनी आपल्या नवीन हवामान अंदाज आज महाराष्ट्रातील पावसाचा मुक्काम लांबला असल्याचे जाहीर केले आहे.
डक यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यात आज पासून पुढील तीन दिवस म्हणजेच 12 13 आणि 14 ऑक्टोबरला पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र आणि कोकणातील काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.
या काळात राज्यातील नंदुरबार धुळे जळगाव नासिक अहिल्यानगर संभाजीनगर चा काही भाग पुणे सातारा सांगली कोल्हापूर या भागात पावसाचे प्रमाण थोडेसे जास्त राहण्याची शक्यता आहे.
तसेच मराठवाड्यातील उर्वरित जिल्ह्यांमध्ये हे तीन दिवस पावसाचे प्रमाण कमी राहणार या भागात अगदीच विखुरलेल्या स्वरूपाचा भाग बदलत पाऊस पडणार असा अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे.
मराठवाड्याप्रमाणेच विदर्भात सुद्धा या काळात पावसाचे प्रमाण थोडेसे कमी राहणार आहे. मात्र एकंदरीत महाराष्ट्राचा विचार केला असता राज्यात 21 ऑक्टोबर पर्यंत पावसाचा मुक्काम राहणार आहे.
खरे तर परतीचा पाऊस आतापर्यंत महाराष्ट्रातून निघून जाणे अपेक्षित होते. मात्र आता दसऱ्याचा सण साजरा होत असतानाही परतीचा पाऊस अजून महाराष्ट्रातून पूर्णपणे माघारी फिरलेला नाही.
सध्या परतीचा पाऊस हा नंदुरबार मध्ये अडखळलेला पाहायला मिळतोय. यामुळे परतीचा पाऊस नेमका कधी माघार घेणार हे पाहण्यासारखे ठरेल. दरम्यान पंजाबरावांनी 21 ऑक्टोबर पर्यंत महाराष्ट्रात पावसाचा मुक्काम राहणार असे म्हटले आहे.
या तारखेपर्यंत राज्यात भाग बदलत पाऊस सुरूच राहणार असा अंदाज त्यांनी दिला आहे. पासून पुढील तीन दिवस महाराष्ट्रात पाऊस बरसणार आहे आणि त्यानंतर काही काळ पावसाची विश्रांती राहणार आहे.
परंतु 17 ऑक्टोबरला पुन्हा एकदा पावसाला सुरुवात होईल आणि 17 ते 21 ऑक्टोबर दरम्यान राज्यात परत एकदा सातारा, पुणे, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, धाराशिव, बीड, लातूर, कोकण, नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, अहिल्यानगर या भागात पावसाची शक्यता आहे.
मात्र या काळात राज्यातील विदर्भ विभागातील पूर्वेकडील आणि पश्चिमेकडील 11 जिल्ह्यांमध्ये पावसाची तीव्रता कमी राहणार असेही पंजाब रावांनी आपल्या नवीन बुलेटिनमध्ये स्पष्ट केले आहे.