Panjabrao Dakh News : आज भाऊबीज सण मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. मात्र या भाऊबीज सणावर पावसाचे विरजण पडण्याची शक्यता आहे. कारण की आज महाराष्ट्रातील मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
पंजाबरावांनी आज राज्यात पावसाची हजेरी पाहायला मिळू शकते असा अंदाज दिला आहे. त्यामुळे मात्र शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे नुकसान होईल अशी भीती व्यक्त होत आहे. पंजाब रावांनी दिलेल्या माहितीनुसार आज अर्थातच 3 नोव्हेंबरला राज्यातील मराठवाडा विभागातील परभणी लातूर नांदेड धाराशिव बीड या जिल्ह्यांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे.
याशिवाय आज मध्य महाराष्ट्रातील अहिल्यानगर कोल्हापूर सांगली सातारा सोलापूर या भागातही पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विशेष बाब अशी की मध्य महाराष्ट्रातील अहिल्यानगर सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर या जिल्ह्यांमध्ये मराठवाड्यातील जिल्ह्यांपेक्षा पावसाचे प्रमाण अधिक राहणार असा मोठा दावा देखील पंजाबरावांनी केला आहे.
यामुळे मध्य महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी आपल्या शेती पिकांचे विशेष काळजी घ्यावी तसेच आपले शेती कामाचे नियोजन देखील पावसाचा अंदाज लक्षात घेऊनच आखावे असा सल्ला देण्यात आला आहे. तसेच पंजाबरावांनी पावसाचे प्रमाण कमी झाल्यानंतर महाराष्ट्रात थंडीला सुरुवात होणार असे म्हटले आहे. तीन नोव्हेंबर नंतर म्हणजे चार नोव्हेंबर पासून महाराष्ट्रातील हवामान कोरडे होणार आहे.
राज्याचे हवामान कोरडे झाल्यानंतर थंडीची तीव्रता वाढणार आहे. अर्थातच 5 नोव्हेंबर पासून यंदा महाराष्ट्रातील थंडीची तीव्रता वाढणार असा मोठा दावा पंजाबरावांनी केलाय. एकंदरीत लवकरच महाराष्ट्रात आता थंडीला सुरुवात होणार आहे. राज्यातील काही भागांमध्ये आता गुलाबी थंडीची चाहूल लागणार आहे.
परंतु राज्यात सर्व दूर पाच नोव्हेंबर नंतरच थंडीला सुरुवात होईल असा अंदाज आहे. खरे तर सध्या ढगाळ हवामानामुळे आणि अन पावसाळी वातावरणामुळे शेती पिकांवर विपरीत परिणाम पाहायला मिळतोय. हेच कारण आहे की शेतकऱ्यांना थंडीची प्रतीक्षा आहे.
थंडीला सुरुवात झाली की रब्बी हंगामातील पिकांना याचा फायदा मिळू शकणार आहे. कांदा तसेच फळ पिकांना देखील थंडीचा फायदा होणार आहे. दरम्यान पाच नोव्हेंबर नंतर राज्यात थंडीची तीव्रता वाढणार असून यामुळे कांदा तसेच फळ उत्पादक शेतकऱ्यांच्या पिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.