Panjabrao Dakh News : पंजाबरावांनी नुकत्याच काही दिवसांपूर्वी वर्तवलेला हवामान अंदाज खरा ठरलाय. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये गेल्या काही दिवसात चांगला पाऊस झाला आहे. यामुळे पंजाब रावांच्या नवीन हवामान अंदाजाकडे साऱ्या महाराष्ट्राचे लक्ष लागून आहे. अशातच आता पंजाब रावांचा एक नवीन अंदाज समोर आला आहे.
पंजाब रावांनी मान्सून महाराष्ट्रातून कधी माघारी फिरणार ? या संदर्भात मोठी अपडेट दिली आहे. पंजाब रावांनी सांगितल्याप्रमाणे 18 ऑक्टोबरला महाराष्ट्रातील जळगाव कडून मान्सूनचा परतीचा प्रवास पुन्हा सुरू होणार आहे.
मात्र मराठवाडा व आजूबाजूच्या परिसरातून 21 तारखेला मान्सून माघारी परतणार आहे. दरम्यान, आज पासून पुढील काही दिवस राज्यात पावसाची शक्यता आहे. आज पासून पुढील सहा दिवस म्हणजेच 13 ऑक्टोबर ते 19 ऑक्टोबर दरम्यान महाराष्ट्रात ठिकठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
या कालावधीत सर्व दूर पाऊस पडणार नाही, भाग बदलत पाऊस पडणार आहे. तसेच 21 ऑक्टोबर पर्यंत संपूर्ण महाराष्ट्रातून मान्सून काढता पाय घेणार आहे.
शिवाय पुढील महिन्याच्या पाच तारखेपासून म्हणजेच पाच नोव्हेंबर पासून महाराष्ट्रात कडाक्याच्या थंडीला सुरुवात होण्याची शक्यता देखील पंजाबरावांच्या माध्यमातून यावेळी वर्तवण्यात आली आहे.
पंजाब रावांच्या नवीन हवामान अंदाजानुसार, 18 ऑक्टोबरला राज्यातील जळगाव, नाशिक, छत्रपती संभाजी नगर, अकोला, अमरावती या भागातून पाऊस परतणार आहे. 19 ऑक्टोबर ला जालना व आजूबाजूच्या भागातून मान्सून माघारी फिरणार आहे.
तसेच 21 ऑक्टोबर पर्यंत राज्यातील इतर सर्व जिल्ह्यांमधून मान्सून माघारी फिरणार असा दावा पंजाबरावांनी यावेळी केला आहे. खरे तर महाराष्ट्रातील मान्सूनचा परतीचा प्रवास हा पाच ऑक्टोबरलाचं सुरू झाला होता.
पण परतीचा पाऊस सुरू झाल्यानंतर काही काळ परतीच्या पावसाचा प्रवास थबकला होता. दरम्यान आता पुन्हा एकदा परतीचा पाऊस सक्रिय होत आहे. 18 ऑक्टोबर पासून परतीचा पाऊस सक्रिय होणार असल्याचा अंदाज पंजाब रावांनी दिला आहे.
18 ऑक्टोबर ते २१ ऑक्टोबर दरम्यान महाराष्ट्रातील सर्वच भागातून पाऊस माघारी फिरणार असा दावा पंजाबरावांनी यावेळी केला आहे. त्यामुळे आता पंजाबरावांचा हा हवामान अंदाज खरा ठरणार का हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
तथापि पंजाब रावांनी आगामी काही दिवस पावसाची शक्यता वर्तवली असल्याने शेतकऱ्यांनी पावसाची शक्यता लक्षात घेऊनच आपल्या शेतीकामांचे नियोजन आखावे असा सल्ला यावेळी जाणकारांनी दिला आहे.