Panjabrao Dakh News : पंजाब रावांचा एक नवीन हवामान अंदाज समोर आला आहे. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांमध्ये पंजाबरावांच्या हवामान अंदाजाची मोठी क्रेझ आहे. हवामान खात्याच्या अंदाजापेक्षा पंजाबरावांच्या हवामान अंदाजावर शेतकऱ्यांचा अधिक विश्वास आहे. दरम्यान जेष्ठ हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी एक नवीन अंदाज जाहीर केला आहे.
पंजाब रावांनी जाहीर केलेल्या नवीन हवामान अंदाजानुसार, महाराष्ट्रात 19 ऑक्टोबर पर्यंत पावसाची शक्यता आहे. म्हणजेच राज्यात आता १९ तारखेपर्यंत पाऊस सुरू राहणार आहे. महत्त्वाचे म्हणजे या काळात सर्व दूर पाऊस पडणार नाही तर भाग बदलत पाऊस पडणार आहे.
पंजाब रावांच्या मते यावर्षी 21 ऑक्टोबर पर्यंत संपूर्ण महाराष्ट्रातून मान्सून माघारी करणार आहे. येत्या चार दिवसांनी अर्थातच 18 तारखेला जळगाव कडून मान्सून माघारी फिरणार आहे. तसेच मराठवाडा व आजूबाजूच्या परिसरातून 21 तारखेच्या सुमारास मान्सून माघारी परतणार आहे.
एकंदरीत 21 ऑक्टोबर पर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात मान्सून माघारी फिरेलं असे पंजाब रावांचे म्हणणे आहे. पंजाबराव म्हणतात की, 18 ऑक्टोबरला जळगाव, नाशिक, छत्रपती संभाजी नगर, अकोला, अमरावती या भागातून पाऊस परतणार आहे.
तसेच 19 ऑक्टोबरला जालना व आजूबाजूच्या भागातून मान्सून माघारी फिरणार आहे. तसेच 21 ऑक्टोबरच्या सुमारास राज्यातील इतर सर्व जिल्ह्यांमधून मान्सून माघारी फिरणार असल्याचा अंदाज पंजाब डख यांच्या माध्यमातून समोर आला आहे.
खरंतर भारती हवामान खात्याने पाच ऑक्टोबर पासून महाराष्ट्रातून मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू झाला असल्याची माहिती दिली होती. मात्र परतीचा पाऊस हा नंदुरबार मध्येच खिळून नाही. नंदुरबार जिल्ह्यातील काही भागांमधून मान्सून माघारी फिरला आहे.
मात्र, तदनंतर मान्सूनच्या परंतीच्या प्रवासात कोणतीच प्रगती झालेली नाही.पण आता लवकरच मान्सून महाराष्ट्रातून माघारी फिरणार आहे. पंजाब डख यांनी 21 ऑक्टोबर पर्यंत संपूर्ण महाराष्ट्रातून मान्सून परतणार असा अंदाज दिला आहे. गेल्या दोन-तीन दिवसांपासून महाराष्ट्रात पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. राज्यातील उत्तर महाराष्ट्रात पावसाचा जोर सर्वाधिक आहे.
उत्तर महाराष्ट्रातील नाशिक मध्ये पावसाची तीव्रता खूपच अधिक आहे. जिल्ह्यातील कळवण सटाणा मालेगाव देवळा या परिसरात गत दोन दिवसांपासून पावसाने चांगलाच दणका दिला आहे. यामुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.