Panjabrao Dakh News : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. ही बातमी आहे पावसा संदर्भात. खरे तर सध्या राज्यातील काही भागांमध्ये सोयाबीन, उडीद सारख्या पिकांची काढणी सुरू आहे. अशा या परिस्थितीतच राज्यात पुन्हा एकदा पाऊस सक्रिय झाला आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या शेतीमालाचे नुकसान होण्याची भीती व्यक्त होत आहे.
दरम्यान, ज्येष्ठ हवामान अभ्यासक पंजाबरावं डख यांनी राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक नवीन अंदाज जारी केला आहे. पंजाबरावांनी 24, 25 आणि 26 सप्टेंबर रोजी महाराष्ट्रातील कोणकोणत्या भागांमध्ये पाऊस पडणार, कोणत्या भागात पावसाची तीव्रता सर्वाधिक राहणार या संदर्भात महत्त्वाची माहिती दिली आहे.
पंजाबरावांचा नवीन अंदाज काय सांगतो
पंजाबरावांनी वर्तवलेल्या सुधारित हवामान अंदाजानुसार 24 ते 26 सप्टेंबर दरम्यान राज्यातील विदर्भ विभागातील पूर्वेकडील आणि पश्चिमेकडील जिल्ह्यांमध्ये विखुरलेल्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. म्हणजेच या काळात विदर्भात सर्वत्र पाऊस पडणार नाही.
भाग बदलत पाऊस पडण्याची शक्यता आहे. मात्र राज्यातील मराठवाडा विभागात 26 तारखेपर्यंत जोरदार पावसाची शक्यता आहे. मराठवाडा बरोबरच उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रात देखील 26 सप्टेंबर पर्यंत मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
काही भागात अक्षरशः अतिवृष्टी सारखा पाऊस पडणार असेही पंजाब रावांनी म्हटले आहे. पंजाब रावांनी वर्तवलेल्या हवामान अंदाजानुसार राज्यातील अकोला, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ, वाशिम, हिंगोली, बुलढाणा, अमरावती, वर्धा या जिल्ह्यांमध्ये सव्वीस तारखेपर्यंत भाग बदलत पाऊस पडणार आहे.
विखुरलेला स्वरूपाचा पाऊस पडणार आहे. परंतु नांदेड, लातूर, बीड, उस्मानाबाद, परभणी, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, पुणे, कोकण, मुंबई, नाशिककडे हे तीन दिवस भाग बदलत जोराचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.
उत्तर महाराष्ट्रात अर्थातच अहमदनगर, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव या जिल्ह्यांमध्ये या काळात पावसाची तीव्रता अधिक राहणार असे भासत आहे. नाशिक जिल्ह्यातील सटाणा मालेगाव देवळा मनमाड या भागात जोराचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.
पंजाब रावांनी दिलेल्या माहितीनुसार नाशिक मुंबई ठाणे पुणे कोकण संभाजीनगर मालेगाव सातारा सांगली कोल्हापूर भागात अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. यामुळे हे तीन दिवस शेतकऱ्यांनी विशेष सावध राहणे आवश्यक आहे. या काळात विजेच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. यामुळे शेतकऱ्यांनी विशेष सावध राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.