Panjabrao Dakh News : पंजाब रावांचा एक नवीन हवामान अंदाज समोर आला आहे. पंजाबरावांनी लवकरच मान्सून महाराष्ट्रातून माघार घेईल असे म्हटले आहे. मात्र तोपर्यंत राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे.
डख यांनी वर्तवलेल्या आपल्या नवीन हवामान अंदाजानुसार, आज राज्यातील नांदेड, लातूर, परभणी, धाराशिव, बीड, अहिल्यानगर, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, कोकण, पश्चिम महाराष्ट्र, छत्रपती संभाजी नगर, जालना या भागात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे.
उद्या पासून मात्र पावसाची तीव्रता थोडीशी वाढणार आहे. डख यांनी सांगितल्याप्रमाणे 19 ते 21 ऑक्टोबर दरम्यान महाराष्ट्राला मान्सून चांगलाचं झोडपणार आहे. या काळात राज्यातील विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, कोकण विभागातील बहुतांशी जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे.
राज्यातील यवतमाळ, नांदेड, हिंगोली, वाशिम, लातूर, परभणी, बुलढाणा, अमरावती, अकोला, छत्रपती संभाजी नगर, जळगाव, जालना, बीड, धाराशिव, अहिल्यानगर, कोल्हापूर, सोलापूर, सांगली, सातारा, नाशिक, कोकण या भागात चांगल्या पावसाची शक्यता आहे.
परंतु हे तीन-चार दिवस राज्यातील खानदेश विभागातील नंदुरबार आणि धुळ्यात पावसाची तीव्रता फारच कमी राहण्याची शक्यता आहे. दुसरीकडे पंजाब रावांनी या तीन दिवसानंतर राज्यात धुई, धुके येईल अन यंदाचा मान्सून रजा घेईल असे म्हटले आहे.
धुई आणि धुके यायला सुरुवात झाली म्हणजेच राज्यात थंडीला सुरुवात होते. यानुसार 24 ऑक्टोबर नंतर राज्यात धुई आणि धुके यायला सुरुवात होईल आणि त्यानंतर लवकरच थंडीला देखील सुरुवात होणार आहे.
पंजाबरावांच्या अंदाजानुसार 22 ऑक्टोबरला उत्तर महाराष्ट्रातून मान्सून माघारी फिरेल, त्यानंतर 23 ऑक्टोबरला मराठवाड्यातून माघारी फिरणार आहे आणि 24 ऑक्टोबरला तो संपूर्ण राज्यातून माघारी फिरणार आहे.
एकंदरीत महाराष्ट्रात आता 24 ऑक्टोबर पर्यंत मान्सूनचा मुक्काम राहणार आहे. त्यानंतर मान्सून महाराष्ट्रातून माघारी फिरणार आहे आणि नंतर थंडीला सुरुवात होणार आहे. साधारणता पाच नोव्हेंबर पासून यावर्षी थंडीला सुरुवात होणार असा अंदाज पंजाबरावांनी दिला आहे.