Panjabrao Dakh News : महाराष्ट्रात गेल्या तीन चार दिवसांपासून पाऊस पुन्हा सक्रिय झाला आहे. 21 तारखेपासून राज्यात पाऊस सक्रिय झाला असून कालपासून महाराष्ट्रातील पावसाचा जोर वाढला आहे. राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस झाला आहे. काही ठिकाणी तर अक्षरशः अतिवृष्टी सारखा पाऊस झाला असून अनेक भागांमध्ये धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे.
खरे तर पंजाबरावांनी नुकत्याच काही दिवसांपूर्वी 21 सप्टेंबर पासून महाराष्ट्रात मुसळधार पावसाला सुरुवात होणार असा अंदाज दिला होता. दरम्यान, आता पंजाबरावांचा हाच हवामान अंदाज खरा ठरला असून 21 सप्टेंबर पासून राज्यात जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे.
अशा परिस्थितीत आता शेतकऱ्यांच्या माध्यमातून हे पावसाचे सावट नेमके कधी थांबणार असा सवाल उपस्थित केला जातोय. दरम्यान आता शेतकऱ्यांच्या याच प्रश्नाचे उत्तर समोर आले आहे. यासंदर्भात ज्येष्ठ हवामान अभ्यासक पंजाब रावांनी आपल्या नवीन बुलेटिन मध्ये डिटेल माहिती दिलेली आहे.
पंजाबरावांनी सांगितल्याप्रमाणे राज्यात 21 सप्टेंबर पासून पावसाला सुरुवात झाली असून ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीपर्यंत पावसाचा जोर कायम राहणार आहे. 2 ऑक्टोबर अर्थातच गांधी जयंतीच्या दिवसापर्यंत महाराष्ट्रात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. म्हणजेच महाराष्ट्रात आणखी सात दिवस जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.
या काळात राज्यातील विदर्भ विभागातील पूर्वत असेच पश्चिमेकडील जिल्ह्यांमध्ये मराठवाडा विभागातील सर्व जिल्ह्यांमध्ये तसेच मध्य महाराष्ट्रातील बहुतांशी जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मुंबई आणि कोकणात देखील पावसाचा जोर कायम राहणार असा अंदाज आहे.
मध्य महाराष्ट्रातील उत्तर महाराष्ट्र विभागातील जिल्ह्यांमध्ये अर्थातच धुळे, नंदुरबार, जळगाव या खानदेशातील तीन जिल्ह्यात आणि अहमदनगर तसेच नाशिक या दोन जिल्ह्यांमध्ये या काळात जोरदार ते अति जोरदार स्वरूपाचा पाऊस पडणार असा अंदाज आहे.
या अनुषंगाने या संबंधित जिल्ह्यांमध्ये नागरिकांनी विशेष सावध राहावे असे आवाहन करण्यात आले आहे. महत्त्वाचे म्हणजे या काळात होणाऱ्या जोरदार पावसामुळे राज्यातील अनेक महत्त्वाची धरणे हाउसफुल होतील असा विश्वास पंजाब रावांनी व्यक्त केला आहे. तथापि नदीकाठी वसणाऱ्या लोकांनी या काळात अधिक दक्ष रहावे असेही त्यांनी म्हटले आहे.
या काळात विजा पडण्याच्या घटना वाढू शकतात असेही त्यांनी आपल्या नवीन अंदाजात स्पष्ट केले असून यामुळे शेतकरी बांधवांनी आपल्या स्वतःच्या जीवाचे आणि पशुधनाची विशेष काळजी घ्यावी असे यावेळी पंजाबरावांनी आपल्या नवीन बुलेटिन मध्ये म्हटले आहे. एकंदरीत राज्यात सध्या सुरू असणारा पाऊस आगामी सात दिवस म्हणजेच 2 ऑक्टोबर पर्यंत कायम राहण्याची शक्यता आहे.