Panjabrao Dakh News : पंजाबराव डख हे एक प्रसिद्ध हवामाना तज्ञ आहेत. शेतकऱ्यांमध्ये पंजाब रावांनी वर्तवलेला हवामान अंदाज कायमच लोकप्रिय राहिला आहे. शेतकऱ्यांच्या मते पंजाब रावांचा हवामान अंदाज त्यांच्यासाठी फायदेशीर ठरत असून यामुळे त्यांना शेती व्यवसायात मोठी मदत होत आहे. आज मात्र आपण पंजाबरावांचा हवामान अंदाज न जाणून घेता त्यांनी शेतकऱ्यांसाठी ज्या काही सूचना जारी केल्या आहेत त्या जाणून घेणार आहोत.
नुकताच पंजाबराव डख यांनी शेतकऱ्यांना विशेषतः सोयाबीन उत्पादकांना एक मोठा कामाचा सल्ला दिला आहे. पंजाबरावांनी सोयाबीन उत्पादकांना या खरीप हंगामात कोणत्या जातीच्या सोयाबीनची पेरणी करावी याविषयी माहिती दिली आहे. खरं पाहता पंजाबराव हे स्वतः एक यशस्वी शेतकरी आहेत.
ते आपल्या शेत जमिनीत हरभरा आणि सोयाबीनची पेरणी करतात. दरम्यान त्यांनी सोयाबीन उत्पादकांना यंदाच्या खरीप हंगामात अधिकचे उत्पादन मिळवण्यासाठी सुधारित जाती पेरण्याचा सल्ला दिला आहे. त्यांनी सांगितल्याप्रमाणे परभणी 612 नामक परभणी कृषी विद्यापीठाने विकसित केलेल्या जातीची शेतकऱ्यांनी पेरणी केल्यास यातून त्यांना अधिक उत्पादन मिळणार आहे.
वास्तविक ही जात अतिवृष्टी मध्ये शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरते. अनेकदा सोयाबीन काढणीच्या अवस्थेत असताना अतिवृष्टी ही महाराष्ट्रात होत असते. यामुळे सोयाबीन उत्पादकांचे सर्वाधिक नुकसान होते. अशा परिस्थितीत या जातीची जर पेरणी केली तर सलग पंधरा दिवस जरी पाऊस कोसळत राहिला तरी देखील या जातीचे सोयाबीन पीक तग धरून राहते.
पावसामुळे या जातीच्या पिकाचे नुकसान कमी होते. याशिवाय पंजाब रावांनी राहुरी कृषी विद्यापीठ यांनी विकसित केलेल्या फुले संगम आणि फुले किमया या जातीची लागवड करण्याचा सल्ला दिला आहे. या दोन्ही जाती एकरी 19 क्विंटल पर्यंतचे उत्पादन देण्यास सक्षम असल्याचा दावा पंजाबराव यांनी केला आहे. निश्चितच पंजाबराव डखं यांनी सांगितलेल्या सोयाबीन जातीची पेरणी करून शेतकरी बांधव अधिकचे उत्पादन या ठिकाणी मिळवू शकणार आहेत.