Panjabrao Dakh News : महाराष्ट्रातील हवामानात बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या चक्रीवादळामुळे बिघाड झाला होता. या चक्रीवादळाच्या प्रभावामुळे राज्यातील अनेक भागांमध्ये ढगाळ हवामान झाले होते अन काही ठिकाणी पाऊसही झाला होता. मात्र आता राज्यातील हवामान निवळले आहे.
अशातच आता पंजाब रावांनी एक नवीन हवामान अंदाज जारी केला आहे. पंजाब रावांनी वर्तवलेल्या हवामान अंदाजानुसार, राज्यात उद्यापासून अर्थातच 9 डिसेंबर पासून कडाक्याच्या थंडीला सुरुवात होणार आहे.
यामुळे ज्या शेतकऱ्यांचे कांदा काढणी बाकी असेल त्यांनी काढणी करून घ्यावी असे पंजाबरावांनी म्हटले आहे. राज्यात आता पुढील काही दिवस पाऊस पडणार नाही.
पण ज्यांना तिरुपतीला जायचे असेल त्यांनी 13 ते 14 तारखे दरम्यान जाऊ नये कारण या काळात तेथे मुसळधार पाऊस पडणार आहे. तिरुपती आणि तामिळनाडूकडे 17 ते 19 तारखे दरम्यान पुन्हा एकदा मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
यामुळे या काळात ज्या लोकांनी तिरुपती कडे जाण्याचा प्लॅन बनवला असेल त्यांनी विशेष सावध राहावे. पण आपल्या महाराष्ट्रात मात्र सध्या कुठेच पाऊस पडणार नाही असे दिसते.
उद्यापासून राज्यातील हवामान कोरडे होणार आणि थंडीचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. उत्तर महाराष्ट्र, पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र या भागात उद्यापासून थंडीचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे.
नऊ तारखेपासून ते 13 तारखेपर्यंत महाराष्ट्रातील हवामान कोरडे राहणार आहे आणि कडाक्याची थंडी पडण्याची शक्यता आहे. पण 13 आणि 14 तारखेला राज्यातील काही भागांमध्ये अंशतः ढगाळ हवामान दिसू शकते.
यामुळे हे दोन दिवस राज्यातील अनेक भागांमध्ये थंडीचे प्रमाण थोडेसे कमी राहण्याची शक्यता आहे. एकंदरीत, महाराष्ट्रात उद्यापासून पुन्हा एकदा थंडीला सुरुवात होणार आहे. राज्यातील सर्वचं जिल्ह्यांमध्ये उद्यापासून कडाक्याच्या थंडीला सुरुवात होणार असा अंदाज आहे.