Panjabrao Dakh News : भारतीय हवामान खात्याने 15 ऑगस्ट पासून पुन्हा एकदा महाराष्ट्रात मान्सून सक्रिय झाला असल्याची माहिती दिली आहे. खरंतर हवामान खात्याने आपल्या आधीच्या अंदाजात 18 ऑगस्ट पासून महाराष्ट्रात पुन्हा पाऊस सक्रिय होणार असे म्हटले होते. मात्र हवामानात आलेल्या बदलांमुळे हवामान खात्याने 15 तारखेपासूनच महाराष्ट्रात पाऊस सक्रिय झाल्याचे जाहीर केले आहे.
यानुसार राज्यात आगामी काही दिवस पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाचा जोर अधिक राहणार असे आयएमडीने आपल्या नवीन बुलेटिन मध्ये स्पष्ट केले आहे. दुसरीकडे पंजाबरावांचाही एक नवीन अंदाज समोर आला आहे.
यामध्ये पंजाब रावांनी आज राज्यात हवामान प्रामुख्याने कोरडे राहणार असे म्हटले आहे. परंतु 18 तारखेपासून म्हणजेच उद्यापासून राज्यात पावसाचा जोर वाढणार आहे. पंजाब रावांनी 18 ऑगस्ट ते 2 सप्टेंबर दरम्यान राज्यातील वेगवेगळ्या भागात जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे.
विदर्भ विभागातील पूर्वेकडील आणि पश्चिमेकडील जिल्ह्यांमध्ये 18 तारखेपासून पावसाचा जोर वाढणार आहे. मराठवाड्यात मात्र पावसाचा जोर 18 ऑगस्ट नंतर वाढेल असे म्हटले जात आहे. उत्तर महाराष्ट्रात मात्र पावसाचा जोर 22 ऑगस्ट पासून वाढण्याची शक्यता आहे.
पश्चिम महाराष्ट्राबाबत बोलायचं झालं तर येथे उद्यापासून पावसाचा जोर वाढणार आहे. विशेष म्हणजे उद्यापासून पश्चिम महाराष्ट्रात राज्याच्या इतर भागांच्या तुलनेत पावसाचा जोर अधिक राहणार आहे.
पश्चिम महाराष्ट्रातील काही भागांमध्ये जुलै आणि ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला जशी पूरस्थिती तयार झाली होती तशीच पूरस्थिती या काळात तयार होऊ शकते असा अंदाज वर्तवला जात आहे.
म्हणजेच 18 ऑगस्ट ते 2 सप्टेंबर या कालावधीत पश्चिम महाराष्ट्रात जोरदार ते अति जोरदार पावसाची शक्यता असून काही ठिकाणी पूरस्थिती तयार होणार अशी भीती पंजाब रावांनी वर्तवली आहे. यामुळे या संबंधित भागातील शेतकऱ्यांनी विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. पूरस्थिती निर्माण झाल्यास सर्वसामान्य जनजीवन देखील विस्कळीत होण्याची शक्यता आहे.
यामुळे सर्वसामान्य नागरिकांना देखील या काळात विशेष सावध राहावे लागणार आहे. शेतकऱ्यांना आपल्या शेती पिकांची तर काळजी घ्यावीच लागणार आहे शिवाय त्यांच्या पशुधनाची देखील त्यांना या काळात विशेष काळजी घ्यावी लागेल.
एकंदरीत महाराष्ट्रात आता जोरदार पावसाला सुरुवात होणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून विश्रांतीवर असणारा पाऊस पुन्हा एकदा जोरदार कमबॅक करणार आहे. यामुळे पावसाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.
पण राज्याच्या काही भागात पूरस्थिती तयार होईल एवढा भयंकर पाऊस पडण्याची शक्यता पंजाब रावांनी वर्तवली असल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेतही भर पडली आहे. यामुळे आता आगामी काही दिवस महाराष्ट्रातील हवामान नेमके कसे राहणार हे पाहण्यासारखे राहणार आहे.