Panjabrao Dakh News : राज्यातील शेतकऱ्यांसाठी पंजाब रावांच्या माध्यमातून एक नवीन हवामान अंदाज समोर आला आहे. पंजाब रावांनी महाराष्ट्रात आता थंडीची लाट येणार असे म्हटले आहे. पंजाब रावांनी जारी केलेल्या नवीन हवामान अंदाजानुसार, महाराष्ट्रात आता पुढील दहा ते बारा दिवस थंडीची लाट राहणार आहे.
राज्यात आता पाऊस पडणार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी काळजी करू नये आणि आपल्या शेतीची कामांचे नियोजन करावे असा सल्ला देण्यात आला आहे.
राज्यातील सध्याचे हवामान हे कांदा काढणीसाठी विशेष पोषक असून ज्या शेतकऱ्यांची कांदा काढणी बाकी असेल त्यांनी कांदा काढणी करायला हरकत नाही असेही पंजाबरावांनी यावेळी नमूद केले आहे.
पण तिरुपतीला दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांकरिता पंजाबरावांनी एक मोठी माहिती दिली आहे. पंजाब रावांनी सांगितल्याप्रमाणे 13 आणि 14 डिसेंबरला तिरुपती आणि तामिळनाडूकडे मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
तसेच या भागात 17 आणि 18 तारखेला देखील जोरदार पाऊस होईल असा अंदाज आहे. यामुळे तिरुपती ला जाणाऱ्या भाविकांनी हा अंदाज लक्षात घेऊनच आपल्या ट्रिपचे आयोजन करावे असे पंजाबरावांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
दरम्यान महाराष्ट्रात आता उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण महाराष्ट्र, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भात जोरदार थंडीची लाट येणार असे पंजाबरावांनी म्हटले आहे.
या काळात राज्यातील उत्तर महाराष्ट्र विभागात सगळ्यात जास्त थंडी पाहायला मिळणार असून मराठवाडा आणि विदर्भातील घाटाखाली सुद्धा थंडीची तीव्रता अधिक पाहायला मिळू शकते असे स्पष्ट करण्यात आले आहे.
एकंदरीत पुढील दहा ते बारा दिवस महाराष्ट्रातील हवामान कोरडे राहणार असून थंडीची तीव्रता वाढणार आहे. महाराष्ट्रात आता कडाक्याच्या थंडीला सुरुवात होणार असल्याने कांदा आणि रब्बी हंगामातील पिकांसाठी सध्याचे हवामान हे पोषक राहणार आहे.
मात्र या हवामानाचा द्राक्ष पिकाला फटका बसण्याची देखील शक्यता आहे. त्यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी कडाक्याच्या थंडीपासून आपल्या पिकाचे संरक्षण करावे असेही पंजाबरावांकडून यावेळी स्पष्ट करण्यात आले आहे.