Panjabrao Dakh News : राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे पंजाबरावांचा एक नवीन हवामान अंदाज समोर आला आहे. यामध्ये पंजाब रावांनी उद्यापासून महाराष्ट्रातील पाऊस गायब होणार असे म्हटले आहे.
उद्यापासून पाऊस रजेवर जाणार असे पंजाब रावांनी आपल्या नवीन हवामान अंदाजात स्पष्ट केले असून राज्यातील काही भागांमध्ये 25 ऑक्टोबर पासूनच थंडीला सुरुवात होईल अशी शक्यता त्यांनी वर्तवली आहे.
खरंतर, गेल्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे मोठे नुकसान झाले असून हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे.
खरीप हंगामातील कांदा, द्राक्ष, डाळिंब अशा सर्वच पिकांचे या पावसाने मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. हा पाऊस कपाशी पिकासाठीही मोठा घातक ठरलाय, सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचे देखील या पावसाने मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे.
शेतकऱ्यांच्या अगदीच हाता-तोंडाशी आलेला घास या पावसाने हिरावून घेतला आहे. यामुळे पाऊस कधी विश्रांती घेणार हा शेतकऱ्यांचा सवाल होता. तसेच दिवाळीच्या काळातही पाऊस पडणार का असाही प्रश्न अनेक शेतकऱ्यांनी उपस्थित केला होता.
दरम्यान, पंजाबरावांच्या या नवीन हवामान अंदाजात याबाबतही मोठी माहिती देण्यात आली आहे. पंजाबरावांनी सांगितल्याप्रमाणे, उद्यापासून महाराष्ट्रातील पाऊस सुट्टीवर जाणार आहे. आता पाऊस रजा घेईल आणि कडाक्याच्या थंडीला सुरुवात होईल असा अंदाज समोर आला आहे.
उद्या अर्थातच 24 ऑक्टोबरला राज्यात धुई आणि धुके येणार आहे. यानंतर, मग थंडीला सुरुवात होणार आहे. 25 ऑक्टोबर पासून राज्यातील काही भागांमध्ये थंडीला सुरुवात होईल आणि पाच नोव्हेंबर पासून राज्यात सर्व दूर थंडी पडेल.
नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापासून कडाक्याच्या थंडीला सुरुवात होणार आहे. पंजाब रावांच्या मते सध्याचा काळ हा रब्बी हंगामातील पिकांच्या पेरणीसाठी सर्वोत्कृष्ट आहे.
यामुळे ज्या शेतकऱ्यांनी अद्याप रब्बी पिकांची पेरणी केलेली नसेल त्यांनी लवकरात लवकर पेरणीची कामे पूर्ण करून घ्यावीत असा सल्ला आहे देखील यावेळी पंजाब रावांनी दिला आहे.