Panjabrao Dakh : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांमध्ये आपल्या हवामान अंदाज साठी पंजाबराव डख हे व्यक्तिमत्व विशेष लोकप्रिय आहे. डखं यांचा हवामान अंदाज तंतोतंत खरा ठरत असल्याचं मत शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे. त्यामुळे राज्यातील कानाकोपऱ्यात डख यांच्या नावाचं वादळ गेल्या काही वर्षात पाहावयास मिळत आहे. राज्यात कदाचित असा एखादाच शेतकरी असेल ज्याला पंजाबराव हे नाव माहिती नाही.
पण नुकतीच सोशल मीडियामध्ये पंजाबराव डख आणि नाशिकच्या एका शेतकऱ्याची कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झाली आहे. यामुळे सध्या महाराष्ट्रात मोठा गदारोळ पाहायला मिळत आहे. शेतकऱ्यांमध्ये सध्या ही कॉल रेकॉर्डिंग वेगाने व्हायरल होत असून यामध्ये परभणीचे हवामान तज्ञ पंजाबराव डख यांच्यावर काही गंभीर आरोप लावण्यात आले आहेत. यामध्ये डख काही कंपन्यांकडून भरमसाठ पैसे घेतात असा आरोप लगावण्यात आला आहे. यामुळे सध्या या रेकॉर्डिंगची मोठी चर्चा आहे.
रेकॉर्डिंगमध्ये जाधव आडनाव असलेला व्यक्ति डख यांच्यावर 50-50 हजार रुपये बियाणे कंपन्यांकडून घेत असल्याचा आरोप करत आहेत. या शेतकऱ्याने कॉल रेकॉर्डिंग मध्ये म्हटल्याप्रमाणे, डखं यांनी नाशिक जिल्ह्यात झालेल्या गारपीटीचे फोटो आपल्या स्टेटसला ठेवले आहेत. एकीकडे गारपिटीमुळे नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. शेतकऱ्यांचे रब्बी हंगामातील काढणीयोग्य पीक वाया गेले आहे. आता शेतकऱ्यांना नेमकां आपला संसाराचा गाडा कसा हाकावा हेच सुचत नाहीये.
पण डखं यांनी या गारपिटीचे फोटो स्टेट्सला ठेवले आहेत. यामुळे या अज्ञात व्यक्तीने गारपीट झाली म्हणून पंजाब रावांना आनंद झाला का? असा प्रश्नच यावेळी त्यांना विचारला आहे. यासोबतच काही व्यक्तिगत आरोप देखील डख यांच्यावर या व्यक्तीने लावले आहेत. यामध्ये पंजाबराव स्वतःभोवती त्यांच्या गावातील चार-पाच गुंड बाळगतात, कंपन्यांकडून 50-50 हजारापर्यंत पैसे घेतात असे काही आरोप आहेत.
हे पण वाचा :- ब्रेकिंग ! शिंदे-फडणवीस सरकारला झटका; राज्य कर्मचाऱ्यांच्या संपात ‘या’ दिवशी राजपत्रित अधिकारी देखील होणार सामील
तसेच या व्यक्तीने पंजाब रावांच्या हवामान अंदाजामुळे शेतमालाच्या बाजारभावावर विपरीत परिणाम होतो असं देखील यामध्ये नमूद केलं आहे. पंजाबराव हवामान अंदाज वर्तवतात त्यामुळे शेतकरी बांधव आपला शेतमाल घाईघाईने विक्रीसाठी काढतो. याचा फायदा घेऊन व्यापाऱ्यांकडून शेतमालाचे बाजार भाव कमी केले जातात. असाच आशयाचा आरोप या व्यक्तीकडून डखं यांच्यावर लावण्यात आला आहे. निश्चितच शेतकऱ्यांमध्ये पंजाबराव अल्पावधीतच विशेष लोकप्रिय झाले आहेत.
यामुळे या रेकॉर्डिंग मध्ये लावण्यात आलेले आरोप पाहता ही रेकॉर्डिंग सध्या महाराष्ट्रभर प्रसार झाली आहे. यामुळे यामागे नेमकं काय सत्य आहे? हा मोठा प्रश्न शेतकऱ्यांच्या पुढ्यात उपस्थित झाला आहे. एकंदरीत यावर आता डख यांच्याकडून नेमकं काय स्पष्टीकरण दिलं जातं हे विशेष पाहण्यासारखं राहणार आहे. ही व्हायरल कॉल रेकॉर्डिंग डाउनलोड करण्यासाठी Panjabrao Dakh Viral Call Recordingया लिंक वर क्लिक करा.
हे पण वाचा :- पुणे-बेंगलोर ग्रीनफिल्ड महामार्ग; रेडिरेकनरच्या दुप्पट की चौपट नेमका मोबदला किती मिळणार? पहा