Panjabrao News : सध्या महाराष्ट्रात दोन गोष्टींची तुफान चर्चा पहावयास मिळत आहे. एक म्हणजे जुनी पेन्शन योजना अन दुसरी म्हणजे पंजाबराव डख यांची. एकीकडे जुनी पेन्शन योजनेच्या मागणीवर राज्य कर्मचारी आक्रमक झाले असून 14 मार्चपासून संपावर गेले आहेत तर दुसरीकडे पंजाबराव डख यांनी वर्तवलेला हवामान अंदाज पुन्हा एकदा तंतोतंत खरा ठरला असून राज्यात सध्या अवकाळी पाऊस आणि गारपीट होत आहे.
यामुळे सोशल मीडियावर पंजाबराव डख यांच्या नावाचं वादळ आलं आहे. अनेक लोकांनी पंजाबराव डख बोलें तैसे ढग हाले असं म्हणतं व्हाट्सअँप आणि instagram वर स्टेट्स ठेवले आहेत. खरं पाहता पंजाबराव डख यांनी 9 मार्च रोजी एक हवामान अंदाज सार्वजनिक केला होता. या अंदाजात डख यांनी 14 मार्च रोजी अहमदनगर, नासिक जिल्ह्यात पाऊस पडेल असं सांगितलं.
तसेच 15 ते 19 मार्चपर्यंत राज्यभर पाऊस पडेल असा अंदाज बांधला होता. डखं यांनी सांगितलेल्या हवामान अंदाजानुसार, 16 ते 19 मार्च दरम्यान यवतमाळ, नांदेड, लातूर, उस्मानाबाद, बीड, परभणी, बुलढाणा, जालना, औरंगाबाद, जळगाव, नाशिक, निफाड, नंदुरबार, अहमदनगर या जिल्ह्यात पाऊस पडण्याची शक्यता आहे.
विशेष म्हणजे 16, 17, 18 तारखेला अधिक पाऊस असेल असा अंदाज त्यांनी नऊ मार्च रोजी बांधला होता. पंजाब रावांनी वर्तवलेला हा अंदाज आता तंतोतंत खरा ठरला असून सोशल मीडियावर त्यांच्या हवामान अंदाजाची आता मोठ्या प्रमाणात चर्चा रंगत आहे.
हे पण वाचा :- शेतकऱ्यांच्या चिंतेत भर; ‘या’ तारखेपर्यंत पाऊस अन गारपीट सुरूच राहणार, हवामान विभागाने जारी केला नवीन अंदाज, दिला गंभीर इशारा
शेतकऱ्यांच्या मते पंजाबरावांचा हवामान अंदाज हा हवामान विभागाच्या अंदाजापेक्षा अधिक सरस ठरला आहे. पंजाबरावांचा हवामान अंदाज शेतकऱ्यांना भारतीय हवामान विभागाच्या अंदाजापेक्षा समजण्यास सोपा वाटतं असल्याने गेल्या काही वर्षांपासून डखं यांची प्रसिद्धी महाराष्ट्रातील ग्रामीण भागात झपाट्याने वाढली आहे.
दरम्यान डखं यांनी वर्तवलेल्या अंदाजानुसार 19 मार्चपर्यंत अर्थातच उद्यापर्यंत राज्यात अवकाळी पाऊस आणि गारपीटीची शक्यता आहे. खर पाहता, पावसाचं वातावरण 26 मार्च पर्यंत महाराष्ट्रात कायम राहू शकतं पण पावसाची तीव्रता ही उद्यापासून कमी होणार आहे असं डख यांनी सांगितल आहे.
हे पण वाचा :- बातमी कामाची! शिंदे-फडणवीस सरकारला गोत्यात आणणारी जुनी पेन्शन योजना नेमकी आहे तरी कशी?, वाचा