CIDCO Lottery 2024:- मुंबईत घर घेण्याचे तुमचे देखील स्वप्न असेल तर आता ते स्वप्न सत्यात उतरू शकणार आहे. म्हाडाच्या पाठोपाठ आता सिडकोच्या माध्यमातून देखील नवीन सोडत लवकरच जाहीर होईल अशी शक्यता वर्तवण्यात येत असून या माध्यमातून सिडको जवळपास 40 हजार घरे विकणार आहे.
दसऱ्याच्या शुभमुहूर्ताच्या पार्श्वभूमीवर ही लॉटरीची प्रक्रिया सिडकोच्या माध्यमातून राबवली जाणार असल्याची माहिती देखील समोर आलेली आहे. साधारणपणे या 40 हजार घरांचे काम डिसेंबर 2024 पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता सिडकोच्या व्यवस्थापकीय संचालकांनी वर्तवलेली आहे.
नवी मुंबईतील खांदेश्वर, वाशी तसेच नेरूळ, जुईनगर, सानपाडा, मानसरोवर आणि खारघर व इतर रेल्वे स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर ही घरे बांधली जात आहेत. विशेष म्हणजे सिडकोच्या माध्यमातून या सोडतमध्ये एक वेगळीच पद्धत अवलंबली जात असून यामध्ये आता ग्राहकांना सदनिका तसेच इमारत व इमारतीवरील मजला निवडण्याची संधी मिळणार आहे.
अजून या घरांसाठी कुठल्याही प्रकारची अधिकृत जाहिरात मात्र सिडकोच्या माध्यमातून काढण्यात आलेली नाही. या घरांविषयीचे अधिकची माहिती अजून तरी उपलब्ध झालेली नाही. परंतु भविष्यामध्ये जर तुम्हाला यासाठी अर्ज करायचा असेल तर तो तुम्ही करू शकणार आहात.
अशा पद्धतीने करा सिडको लॉटरीसाठी अर्ज
1- याकरिता सगळ्यात अगोदर तुम्हाला सिडकोची अधिकृत वेबसाईटवर जाणे गरजेचे राहिल व तुम्ही https://lottery.cidcoindia.com या वेबसाईटवर जाऊ शकतात.
2- त्यानंतर तुम्हाला रजिस्टर फॉर लॉटरी ऑप्शन निवडावा लागेल.
3- नंतर तुमचा सध्याचा पत्ता तसेच पॅन व आधार कार्ड आणि बँक खात्याचा तपशील इत्यादी माहिती भरावी लागेल.
4- तुम्हाला या सिडकोच्या संकेतस्थळावर जी कागदपत्रे सांगितलेले आहेत ती आवश्यक कागदपत्रे डिजिटल स्वरूपामध्ये तुम्हाला अपलोड करावे लागतील.
5- त्यानंतर तुम्ही सिडकोच्या घरासाठी भरलेला ऑनलाईन अर्ज नीट व काळजीपूर्वक वाचावा.
6- तुम्ही भरलेली सर्व माहिती बरोबर आहे हे तपासून नंतर अर्ज सबमिट करावा.
7- त्यानंतर नोंदणी शुल्क भरून झाल्यावर तुम्ही जो काही तुमचा उत्पन्न गट निवडाल त्यानुसार पेमेंट करावे. पेमेंट करण्याकरिता तुम्ही ऑनलाईन बँकिंग किंवा क्रेडिट/ डेबिट कार्ड अशा पर्यायांचा वापर करू शकतात.
8- अर्ज दाखल केल्यानंतर तुम्ही त्या अर्जाची प्रिंट काढू शकतात.
सिडको लॉटरीसाठी आवश्यक कागदपत्रे
तुम्हाला देखील सिडको लॉटरीच्या माध्यमातून घरासाठी अर्ज करायचा असेल तर त्याकरिता तुमच्याकडे पॅन कार्ड, आधार कार्ड तसेच अधिवास प्रमाणपत्र म्हणजेच डोमिसाईल सर्टिफिकेट, उत्पन्नाचा दाखला, मतदार ओळखपत्र, पासपोर्ट साईज फोटो, जन्म प्रमाणपत्र, अर्जदाराचा संपर्क तपशील आणि बँकेचा तपशील इत्यादी कागदपत्रे लागतात.
सिडको लॉटरी 2024 साठी अर्ज करण्याकरिता आवश्यक पात्रतेचे निकष
1- सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे तुम्हाला जर सिडको लॉटरी करिता अर्ज करायचा असेल तर अर्जदार म्हणून तुमचे महाराष्ट्रात किमान पंधरा वर्षे वास्तव्य आहे हे दाखवण्यासाठी तुमच्याकडे अधिवास प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
यामध्ये तुम्ही नवी मुंबईचे रहिवाशी असल्याचे कुठल्याही प्रकारची आवश्यकता नाही. तर तुम्ही महाराष्ट्रात कुठलेही रहिवासी असला तरी त्याचा तुम्हाला पुरावा सादर करणे गरजेचे राहील. याचाच अर्थ तुम्ही मुंबई बाहेरचे जरी असाल तरी तुम्हाला आता या लॉटरीच्या माध्यमातून मुंबईत घर मिळू शकणार आहे.
2- तसेच तुम्हाला उत्पन्नाचा पुरावा सादर करणे देखील गरजेचे आहे. म्हणजेच या लॉटरी योजनेअंतर्गत ईडब्ल्यूएस फ्लॅट पाहत असाल तर तुम्हाला तुमचे उत्पन्न दर महिना 25000 पेक्षा जास्त असता कामा नये. जर तुम्ही एलआयजी सिडको लॉटरी योजनेअंतर्गत अर्ज करणार असाल तर तुम्ही महिन्याला पंचवीस ते पन्नास हजार रुपये कमावता आहात heदाखवण्यासाठी उत्पन्नाचा पुरावा असणे आवश्यक आहे.