Personality Test : आपण आपल्या दैनंदिन जीवनात अनेक लोकांना भेटतो. शिक्षण, नोकरी आणि व्यवसायाच्या निमित्ताने दररोज अनेकांसोबत आपले बोलणे चालणे घडतं असते. पण, आपण दिवसातून जेवढ्या लोकांना भेटतो त्या सर्व लोकांची बोलण्याची आणि काम करण्याची पद्धत वेगळी असते. या सृष्टीवर असणारा प्रत्येक माणूस हा युनिक असतो.
प्रत्येकाची काम करण्याची, बोलण्याची, लिखाणाची, चालण्याची अशी सर्वच पद्धत वेगवेगळी असते आणि आपण माणसाच्या वागण्यावरून त्याच्या स्वभावाचा अंदाज बांधतो. माणसाची वागणूक हीच खऱ्या अर्थाने त्याची ओळख बनते. कोणी आपल्याशी प्रेमाने वागला, दोन शब्द चांगले बोलला तर आपण त्या व्यक्तीला चांगले समजतो.
पण जर ते वाईट वागले तर आपण अशा व्यक्तीला उद्धट म्हणतो किंवा वाईट म्हणतो. पण, एखाद्या व्यक्तीला केवळ त्याच्या स्वभावाच्या आधारावर पूर्णपणे ओळखणे हे कठीण काम आहे. यामुळे एखाद्या विशिष्ट प्रसंगी जर एखादा व्यक्ती आपल्या सोबत वाईट वागला असेल तर तो व्यक्तीच वाईट आहे असं म्हणणे चुकीचे ठरेल.
अशा परिस्थितीत योग्य व्यक्तिमत्त्व कसे ओळखायचे हा एक मोठा प्रश्न आहे. त्यामुळे आज आपण व्यक्तीच्या शरीराच्या बनावटीवरून व्यक्तीचा स्वभाव आणि त्याचे भविष्य त्याचे व्यक्तिमत्व कसे ओळखायचे याबाबत जाणून घेणार आहोत. आज आपण फक्त व्यक्तीच्या हाताच्या बोटांवरून व्यक्तीचा स्वभाव कसा आहे हे कसं ओळखायचे याविषयी थोडक्यात माहिती पाहणार आहोत.
तर्जनी आणि अनामिका सारखेच असेल तर : जर तुमच्या आजूबाजूला असणाऱ्या माणसांपैकी एखाद्याच्या हाताच्या बोटापैकी तर्जनी आणि अनामिका बोट सारखे असेल तर समजून जा की असे व्यक्ती खूपच प्रामाणिक असतात. हे लोक त्यांना दिलेली कामे अगदीच चोखपणे पार पाडतात, सर्व कामे जबाबदारीने करतात. हे लोक आपल्या कामासंदर्भात सिरीयस असतात आणि नातेसंबंधांबाबतही या लोकांची अशीच मानसिकता असते. जे लोक इतरांना फसवतात असे लोक यांना मुळीच आवडत नाहीत.
लांब बोटे : काही लोकांच्या हाताची बोटे खूप लांब आणि पातळ असतात. जर तुमच्याशी आजूबाजूला असणाऱ्या लोकांमध्ये अशी व्यक्ती असेल तर समजून जा की असे लोक नेहमी इतरांना मदत करण्यास तयार असतात. हे लोक इतरांना मदत करणारे असतात आणि यांना माणुसकी असते. हे लोक खूपच प्रामाणिक आणि विश्वासार्ह असतात. तुम्ही तुमच्या मनातील सिक्रेट यांना सांगितले तर ते कुठेच लिक होणार नाही हे नक्की. या लोकांवर तुम्ही अगदीच आंधळेपणाने विश्वास ठेवू शकता.
तर्जनी लांब असणारे लोक : असे म्हटले जाते की ज्या लोकांच्या हाताची तर्जनी लांब असते ते खूप बुद्धिमान असतात. त्यामुळे जर तुमच्याही आजूबाजूला असे लोक असतील तर अशा लोकांच्या सानिध्यात राहणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे. या लोकांची सर्वात मोठी ताकद त्यांची बुद्धिमत्ता आहे आणि हे लोक कोणाचीही पर्वा करत नाहीत. हे लोक आपले ध्येय सहज साध्य करतात. निडर आणि बुद्धिमान असणारी ही लोक नेहमीच टॉपवर असतात.
तर्जनी अनामिका बोटापेक्षा लहान असेल तर : जर एखाद्या व्यक्तीची तर्जनी अनामिकापेक्षा लहान असेल तर अशा लोकांमध्ये कॉन्फिडन्स कमी असतो. जर तुमच्याही आजूबाजूला अशी व्यक्ती असेल तर तुम्ही अशा व्यक्तीचे निरीक्षण करा. अशा व्यक्तीचे निरीक्षण केल्यानंतर तुम्हाला लगेच जाणवेल की हे लोक थोडेसे नकारात्मक असतात. हे लोक छोट्या छोट्या गोष्टींवरून निराश होतात. हीच गोष्ट या लोकांना यशापासून दूर ठेवते.
याचा अर्थ असे लोक यशस्वी होत नाही असे नाही, तर यातीलही बहुतांशी लोक नकारात्मकता असतानाही यशाला गवसणी घालतात. मात्र या लोकांना यशस्वी होण्यासाठी फारच अधिक मेहनत घ्यावी लागते. अनेकदा खूप प्रयत्न करतात पण त्यांना सहजासहजी यश मिळत नाही. कधी कधी ते स्वतःच्या फायद्यासाठी इतरांचे नुकसानही करतात.