स्पेशल

तुमची रिंग फिंगर सांगणार तुमचं भविष्य ! हाताच्या अनामिका बोटावरून कळतो तुमचा स्वभाव आणि व्यक्तिमत्व

Personality Test : प्रत्येकाचे हात, पाय, डोळे, नाक, कान वेगवेगळे असतात. प्रत्येक व्यक्तीचा शरीराचा आकार, चेहरा हा वेगवेगळा असतो. या जगात असणाऱ्या प्रत्येकाचे शरीर हे भिन्न असते आणि प्रत्येकाचा स्वभाव आणि व्यक्तिमत्व सुद्धा भिन्न असते. मात्र तुम्ही कधी विचार केला आहे का की हातापायाच्या आकारावरून देखील व्यक्तीचा स्वभाव अन व्यक्तिमत्व ओळखले जाऊ शकते.

असं म्हणतात की फक्त व्यक्तीच्या हाताच्या एका बोटावरून देखील त्याचे भविष्य आणि त्याचा स्वभाव समजतो. दरम्यान आज आपण हाताच्या रिंग फिंगरवरून म्हणजेच अनामिकावरून व्यक्तीचे भविष्य कसे आहे याबाबत काय सांगितले गेले आहे याविषयी अगदी थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

रिंग फिंगरचा आकार सांगणार तुमचा स्वभाव

अनामिका मधल्या बोटा पेक्षा मोठी असेल तर : काही लोकांची अनामिका मधल्या बोटापेक्षा मोठी असते. जर तुमच्याही ग्रुपमध्ये असे लोक असतील तर समजून जा की हे लोक कोणतीही परिस्थिती सहजतेने हाताळण्यात सक्षम असतात. आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक परिस्थितीला धैर्याने सामोरे जाण्याची हातोटी या लोकांना वेगळे बनवते.

परिस्थिती कितीही कठीण असली तरी धोका पत्करायला ते घाबरत नाहीत. त्यांना ठामपणे निर्णय कसे घ्यायचे हे माहित आहे. अत्यंत कठीण परिस्थितीही त्यांचा पराभव करू शकत नाही. या उलट कठीण परिस्थितीत हे लोक अधिक चमकतात आणि चांगली कामगिरी करतात.

तर्जनी पेक्षा अनामिका छोटी असल्यास : जर तुमच्या आजूबाजूला तर्जनी पेक्षा अनामिका छोटी असणारे लोक असतील तर समजून जा की हे लोक आत्मविश्वासाने परिपूर्ण असतात. या लोकांचा आत्मविश्वास यांच्या यशामागे महत्त्वाची भूमिका निभावतो. या लोकांना आकर्षणाचे केंद्र बनणे नेहमीच आवडते. या लोकांना स्वतःची स्तुती ऐकणे आवडते. हे लोक निर्मळ मनाचेच असतात.

अनामिका तर्जनी पेक्षा लांब असल्यास : तुमच्या आजूबाजूला असणाऱ्या शेकडो लोकांपैकी काही लोकांची अनामिका ही तर्जनी पेक्षा लांब असेल. जर तुम्हाला असे लोक दिसले तर समजून जा की अशा लोकांचे व्यक्तिमत्त्व हे खूप आकर्षक असते.

मात्र या लोकांचा एक कमकुवत पक्ष असतो तो म्हणजे या लोकांना लवकर राग येतो. हे लोक जीवनात धोका पत्करण्यास कधीही घाबरत नाहीत. हे लोक खूप प्रतिभावान असतात आणि त्यांचे मन देखील खूपचं तेजस्वी असते. असे लोक आपल्या आयुष्यात चांगली झेप घेतात आणि यशस्वी होतात.

अनामिका आणि तर्जनीची लांबी सारखी असल्यास : काही लोकांची अनामिका आणि तर्जनीची लांबी ही सारखी असते. तर तुमच्या आजूबाजूला असे लोक असतील तर असे लोक स्वभावाने खूपच शांत असतात. शांत स्वभावामुळे या लोकांचे कोणासोबतच बिघडत नाही.

विनाकारण या लोकांना भांडण करणे आवडत नाही. कोणताही निर्णय घ्यायचा असेल तर अगदीच शांत डोक्याने निर्णय घेण्याची क्षमता या लोकांमध्ये असते आणि यामुळे यांनी घेतलेला निर्णय सहसा फेल जात नाही

Tejas B Shelar

Based in Ahmednagar, Maharashtra, I Am a Founder Editor for Ahmednagarlive24, Covering Politics, Technology, Automobile, Finance, Investment and Share Market Related News. For News Tips, You Can Reach Me at edit.tejasbshelar@gmail.com

Published by
Tejas B Shelar

Recent Posts