Petrol Diesel Price : लोकसभा निवडणुकीच्या आधी केंद्रातील मोदी सरकार पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी करणार असल्याचा दावा केला जात होता. मीडिया रिपोर्टमध्ये पेट्रोलियम उत्पादने जीएसटीच्या कक्षेत आणून इंधनाचे दर कमी करण्याचा प्रयत्न सरकारकडून केला जाणार असे म्हटले जात होते.
विशेष म्हणजे स्वतः अर्थमंत्री निर्मला सीतारामन जी यांनी पेट्रोलियम उत्पादने जीएसटीच्या कक्षेत आणण्यासाठी केंद्र सरकार इच्छुक असल्याचे सांगितले होते. मात्र याबाबतचा निर्णय हा राज्यांना घ्यायचा आहे असे देखील केंद्रीय अर्थमंत्र्यांनी स्पष्ट केले.
पेट्रोल आणि डिझेलचे भाव एकसारखे होणार
पण, नुकत्याच काही दिवसांपूर्वी झालेल्या जीएसटी परिषदेच्या बैठकीत या संदर्भात कोणताच निर्णय झाला नाही. मात्र, आगामी काळात पेट्रोलियम उत्पादने जीएसटीच्या कक्षेत आणले जाऊ शकतात आणि यामुळे देशातील पेट्रोल आणि डिझेलचे भाव एकसारखे होणार आहेत.
पेट्रोल आणि डिझेलच्या दरात मोठ्या प्रमाणात कपात
यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या दरात मोठ्या प्रमाणात कपात होईल अशी शक्यता आहे. नक्कीच सरकारने पेट्रोलियम उत्पादन GST च्या कक्षेत आणण्याचा निर्णय घेतला तर याचा सर्वसामान्यांना दिलासा मिळणार आहे. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात फारसा बदल होत नसल्याचे चित्र संपूर्ण देशभरात पाहायला मिळते.
हे रेट आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किंमतीवर अवलंबून असतात. कच्च्या तेलाच्या किंमती रोज बदलतात. अशा परिस्थितीत आज आपण महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमधील पेट्रोल आणि डिझेलचे भाव थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
राज्यातील प्रमुख शहरांमधील पेट्रोल आणि डिझेलचे भाव
राजधानी मुंबई : पेट्रोल १०३.४४ रुपये अन डिझेल ८९.९७ रुपये
कोल्हापूर : १०४.३८ रुपये अन डिझेल ९०.९३ रुपये
पुणे : पेट्रोल १०३.९५ अन डिझेल ९०.४८ रुपये
नाशिक : पेट्रोल १०४.०९ रुपये अन डिझेल ९०.६२ रुपये
सातारा : पेट्रोल १०५.०७ रुपये डिझेल ९१.५६ रुपये
छत्रपती संभाजी नगर : पेट्रोल १०४.४७ रुपये अन डिझेल ९०.९९ रुपये