Petrol Diesel Price : सध्या दिवाळीचा सण सुरू असून याच दिपोत्सवाच्या काळात सर्वसामान्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. यंदा सर्वसामान्यांसाठी दिवाळी विशेष खास ठरणार आहे. कारण की आगामी काळात पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत कपात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
असे झाल्यास ही सर्वसामान्यांसाठी नक्कीच मोठी दिवाळी भेट ठरणार आहे. आगामी काळात पेट्रोलच्या किमती पाच रुपयांनी आणि डिझेलच्या किमती दोन रुपयांनी कमी होऊ शकतात असे संकेत सरकारमधील मंत्र्यांकडून दिले जात आहेत.
केंद्रातील केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी आगामी काळात पेट्रोल डिझेलचे दर स्वस्त होतील असे संकेत दिले आहेत. केंद्रीय मंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे धनतेरस च्या शुभमुहूर्तावर तेल कंपन्यांनी पेट्रोल पंप डीलर्स ला मोठी भेट दिली आहे.
यानिमित्ताने गेल्या सात वर्षांपासून ची मागणी आता पूर्ण झाली आहे. त्यामुळे ग्राहकांना आगामी काळात चांगली सेवा उपलब्ध होणार आहे. तेल कंपन्यांनी पेट्रोल पंप डीलरच्या कमिशनमध्ये वाढ केली असल्याने याचा फायदा पेट्रोल पंप डीलर ला होणार आहे.
मात्र यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढणार नसून कमी होतील असे म्हटले जात आहे. दुर्गम ठिकाणी पेट्रोल आणि डिझेलची आंतरराज्य मालवाहतूक सुलभ करण्यासाठीही तेल कंपन्यांनी निर्णय घेतलाय.
यामुळे ओडिशाच्या मलकानगिरीच्या कुननपल्ली आणि कालीमेलामध्ये पेट्रोलचे दर 4.69 रुपये आणि 4.55 रुपये आणि डिझेलच्या दरात 4.45 रुपये आणि 4.45 रुपयांनी कपात केली जाईल. तसेच छत्तीसगडच्या सुकमामध्ये पेट्रोलच्या दरात 2.09 रुपयांनी तर डिझेलच्या दरात 2.02 रुपयांनी घट होणार आहे.
खरंतर लोकसभा निवडणुकीच्या आधी पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत कपात झाली होती. दोन रुपये प्रति लिटर या दराने तेव्हा कपात करण्यात आली होती. तेव्हापासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात झालेली नाही. पण आता पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात होणे शक्य आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना याचा फायदा होणार आहे.
सोबतच पेट्रोल पंप डीलरच्या कमिशनमध्ये वाढ करण्यात आली असल्याने पेट्रोल पंप वर कामाला असणाऱ्या कर्मचाऱ्यांना आणि पेट्रोल पंप डीलर्स ला देखील मोठा लाभ मिळण्याची शक्यता आहे. या निर्णयामुळे देशातील सहा राज्यांमधील पेट्रोल आणि डिझेलच्या किमती स्वस्त होणार आहेत.
कोणत्या राज्यात कमी होणार पेट्रोल डिझेलच्या किमती
छत्तीसगडमध्ये पेट्रोलच्या किमती 2.70 रुपयांनी आणि डिझेलच्या किमती 2.60 रुपयांपर्यंत घसरण्याची शक्यता आहे. अरुणाचल प्रदेश मध्ये पेट्रोलच्या किमती 3.96 रुपयांपर्यंत आणि डिझेलच्या किमती 3.12 पर्यंत घसरण्याची शक्यता आहे.
हिमाचल प्रदेश मध्ये पेट्रोलच्या किमती 3.59 आणि डिझेलच्या किमती 3.13 रुपयांनी कमी होण्याची शक्यता आहे. मिझोरम मध्ये पेट्रोल 2.73 रुपये आणि डिझेल 2.38 रुपयांनी स्वस्त होणार आहे. ओडिशा राज्यात पेट्रोलच्या किमती 4.69 रुपयांनी आणि डिझेलच्या किमती 4.45 रुपयांनी कमी होण्याची शक्यता आहे.