स्पेशल

एक लिटर पेट्रोल विकल्यास पेट्रोल पंप चालकाला किती कमिशन मिळते ? वाचा सविस्तर

Petrol Pump Commission : एक लिटर पेट्रोल विकल्यास पेट्रोल पंप चालकाला किती कमिशन मिळते याचा कधी विचार केला आहे का? नाही ना मग आज आपण याच संदर्भात माहिती पाहणार आहोत. खरे तर पेट्रोल आणि डिझेल हे जीवनावश्यक बनले आहे. आपण सर्वजण वाहन चालवतो. टू व्हीलर, थ्री व्हीलर, फोर व्हीलर तसेच मालवाहतूक गाड्यांसाठी या इंधनाचा मोठ्या प्रमाणात वापर होतो.

मात्र अलीकडे पेट्रोल डिझेलच्या किमतीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिकांना याचा मोठा फटका बसतोय. पेट्रोल डिझेलच्या वाढलेल्या किमती सर्वसामान्यांसाठी अगदीच चिंतेचा विषय ठरत आहेत. विरोधकांच्या माध्यमातून पेट्रोल आणि डिझेलच्या वाढलेल्या किमतीवरून नेहमीच सरकारला घेरण्याचे काम केले जाते.

यासाठी विरोधकांकडून सातत्याने आंदोलन देखील केली जातात. सर्वसामान्य जनतेमध्ये देखील पेट्रोल डिझेलच्या वाढलेल्या किमतीमुळे सरकार विरोधात मोठ्या प्रमाणात नाराजी आहे. विरोधक 2014 मध्ये असणाऱ्या पेट्रोल डिझेलच्या किमती आणि 2024 मध्ये असणाऱ्या पेट्रोल डिझेलच्या किमती दाखवत सरकार विरोधात आवाज बुलंद करत आहे.

वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर पेट्रोल डिझेलच्या किमती देखील मोठ्या प्रमाणात वाढलेल्या आहेत. मात्र गेल्या काही वर्षांमध्ये तेल कंपन्या पेट्रोल डिझेल मधून मोठ्या प्रमाणात नफा कमवताना दिसतायेत.

अशा परिस्थितीत आज आपण पेट्रोल आणि डिझेलवर डीलर ला म्हणजेच पेट्रोल पंप चालकाला किती कमिशन मिळते या संदर्भात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. एक लिटर पेट्रोल विकले तर पेट्रोल पंप चालकाला किती कमिशन मिळते? हाच आजचा आपला हा विषय.

पेट्रोल पंप चालकाला किती कमिशन मिळतं बरं?

आम्ही आपणास सांगू इच्छितो की भारतात पेट्रोल-डिझेलच्या किंमती या प्रत्येक राज्यांत अन प्रत्येक शहरांमध्ये वेगवेगळ्या असतात. म्हणजेच मुंबईमध्ये पेट्रोल डिझेलची जी किंमत असेल ती नाशिक मध्ये राहणार नाही आणि जी नाशिक मध्ये किंमत असेल ती मालेगावात राहणार नाही.

दरम्यान महाराष्ट्रात काल, 19 नोव्हेंबर रोजी पेट्रोलची सरासरी किंमत 104.90 रुपये प्रति लिटर एवढी होती. पेट्रोल जसं वेगवेगळ्या शहरांमध्ये वेगवेगळ्या किंमतीत विकलं जातं. त्याच प्रमाणे कमीशनही पेट्रोलच्या किंमतींवरुन ठरवलं जातं.

ज्यामुळे ते प्रत्येक शहरांमध्ये वेगवेगळं असतं. पण, प्रति लिटर दराप्रमाणे पेट्रोल पंप मालकांना प्रॉफिट मिळतो म्हणजेच प्रतिलिटर दराप्रमाणे पेट्रोल पंप चालकांना कमिशन मिळत असते. जेवढं जास्त लिटर पेट्रोल विकलं जाईल तेवढी जास्त कमाई त्यांची होते.

मिळालेल्या माहितीनुसार पेट्रोलच्या विक्री मागे प्रति किलोलीटर 1868.14 रुपये मिळतात आणि डिझेलसाठी 1389.35 रुपये कमिशन कमावता येते. आम्ही आपणास सांगू इच्छितो की एक किलोलिटर म्हणजेच 1000 लिटर. यानुसार एक लेटर पेट्रोल आणि डिझेलवर सरासरी दोन रुपये एवढे कमिशन पेट्रोल पंप चालकांना मिळते.

Tejas B Shelar

Based in Ahmednagar, Maharashtra, I Am a Founder Editor for Ahmednagarlive24, Covering Politics, Technology, Automobile, Finance, Investment and Share Market Related News. For News Tips, You Can Reach Me at edit.tejasbshelar@gmail.com

Published by
Tejas B Shelar

Recent Posts