स्पेशल

मज्जाच मजा ! दिवाळीनंतर कोकणात फिरायला जाण्याचा प्लॅन बनवताय ? ‘या’ जागांना आवश्य भेट द्या

Picnic After Diwali : सध्या दीपोत्सवाचा सण मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये अनेक जण आपल्या मूळ गावाकडे परतले आहेत. तसेच काही लोकांनी दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये पिकनिक चा प्लॅन बनवला आहे.

तर काही लोक भाऊबीज नंतर पिकनिकला जाणार आहेत. यामुळे जर तुमचाही असाच काहीच आपल्या नसेल तर तुमच्यासाठी आजचा हा लेख खूपच कामाचा ठरणार आहे.

कारण की आज आपण दिवाळीनंतर कोकणात फिरायला जाणाऱ्या लोकांसाठी टॉप तीन ठिकाणांची माहिती घेऊन हजर झालो आहोत. यामुळे जर तुमचाही दिवाळीनंतर कुठे फिरायला जाण्याचा प्लॅन असेल तर तुम्ही या ठिकाणांना भेट देऊन तुमची पिकनिक एन्जॉय करू शकणार आहात.

ही आहेत कोकणातील नयनरम्य ठिकाणे
दापोली : दिवाळीनंतर पिकनिकला जाण्यासाठी कोकणातील दापोली हे ठिकाण एक बेस्ट ऑप्शन ठरणार आहे. महत्त्वाचे म्हणजे हे ठिकाण मुंबईपासून अगदीच हाकेच्या अंतरावर आहे. मुंबईत राहणारे लोक अवघ्या काही तासात दापोलीला जाऊ शकणार आहेत. या ठिकाणी दरवर्षी हजारो पर्यटक भेटी देत असतात. दररोज येथे पर्यटकांची वर्दळ पाहायला मिळते. दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये तर येथे येणाऱ्यांची संख्या खूपच वाढते. दापोलीला निसर्गाचं वरदान लाभलेले स्वच्छ आणि कमी गर्दी असलेले समुद्रकिनारे आहेत. त्यामुळे तुम्ही येथे पिकनिकचा प्लॅन बनवून तुमची ट्रिप एन्जॉय करू शकता.

गणपतीपुळे : कोकणातील सर्वाधिक नयनरम्य ठिकाणांमध्ये गणपतीपुळ्याचा समावेश होतो. या ठिकाणी तुम्ही तुमच्या परिवारासमवेत किंवा मित्रांसमवेत ट्रीपचे नियोजन करू शकता. गणपतीपुळे येथे असणारे गणेश मंदिर हे संपूर्ण जगात प्रसिद्ध आहे. यामुळे या ठिकाणी देवदर्शनासाठी नेहमीच भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळते. शिवाय गणपतीपुळे येथे विस्तृत समुद्रकिनारा देखील आहे. यामुळे समुद्रकिनाऱ्याची सफर करायची इच्छा असेल तर दिवाळीनंतर तुम्ही येथे जाऊ शकता. या ठिकाणी असणारे गणरायाचे मंदिर हे तब्बल 1600 वर्ष जुने आहे. 1600 वर्षांपूर्वी निर्माण झालेले स्वयंभू गणरायाचे मंदिर हे येथील सर्वात महत्त्वाचे अन मोठे आकर्षणाचे केंद्र आहे. कोकणाची पांढरी वाळू जर तुम्हाला पाहायची असेल तर गणपतीपुळे येथे असणाऱ्या समुद्रकिनाऱ्याला भेट द्या. या ठिकाणी जाऊन समुद्रकिनाऱ्यावर भटकंती करण्याची मजाच काही और आहे.

श्रीवर्धन : दिवाळीनंतर पिकनिकचा प्लॅन असेल तर कोकणातील श्रीवर्धन हे ठिकाण तुमच्यासाठी बेस्ट ठरणार आहे. या ठिकाणी तुम्हाला समुद्रकिनारा पाहायला मिळतो. येथील समुद्रकिनाऱ्यावर जाऊन सनसेट पॉईंट अर्थातच सूर्यास्ताचा नजारा पाहणे म्हणजेच जणू काही स्वर्गाचे दर्शन घेणे असे समीकरण आहे. श्रीवर्धन येथे असणारे लक्ष्मीनारायणाचे मंदिर देखील जगप्रसिद्ध आहे. शिल्पकलेचा अप्रतिम नमुना असलेली विष्णुमूर्ती पाहण्यासाठी अन विष्णू देवाचे दर्शन घेण्यासाठी येथे जगभरातील भाविक या ठिकाणी गर्दी करतात. यामुळे पिकनिकचा प्लॅन असेल तर हे ठिकाण तुम्ही आवर्जून एक्सप्लोर करायला हवे.

Tejas B Shelar

Based in Ahmednagar, Maharashtra, I Am a Founder Editor for Ahmednagarlive24, Covering Politics, Technology, Automobile, Finance, Investment and Share Market Related News. For News Tips, You Can Reach Me at edit.tejasbshelar@gmail.com

Published by
Tejas B Shelar

Recent Posts