Picnic Spot For March : फेब्रुवारी महिना येत्या काही दिवसात संपणार आहे. नवीन मार्च महिन्याला लवकरच सुरुवात होणार आहे. खरे तर मार्च महिना हा संक्रमणाचा महिना असतो. अर्थातच या महिन्यात हिवाळ्याचा शेवट होतो आणि उन्हाळ्याला सुरुवात होते. मार्चमध्ये खूप कडक ऊन लागत नाही मात्र उन्हाची झळ बसू लागते.
सौम्य उष्णता भासते. त्यामुळे मार्च महिन्यात अनेक जण पर्यटनाचा विचार करतात. जर तुमचाही असाच काहीच प्लॅन असेल, तुम्हालाही मार्च महिन्यात कुठंतरी फिरायला जायचं असेल तर आजची ही बातमी तुमच्यासाठी खूपच खास राहणार आहे.
कारण की आज आपण मार्च महिन्यात फिरण्याजोगी काही प्रसिद्ध पिकनिक स्पॉट ची माहिती थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. चला तर मग वेळ न दवडता जाणून घेऊया याविषयी सविस्तर.
हंपी : उन्हाळ्याच्या अगदी सुरुवातीला जर तुमचा पर्यटनाचा विचार असेल तर हे ठिकाण तुमच्यासाठी बेस्ट ठरणार आहे. खरे तर येथे बारा महिने पर्यटकांची वर्दळ पाहायला मिळते. युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांमध्ये या पर्यटन स्थळाचा समावेश होतो.
यामुळे येथे मोठ्या प्रमाणात पर्यटक व्हिजिट देत असतात. जर तुम्हालाही जागतिक वारसा स्थळे पाहण्याची आवड असेल तर हे ठिकाण तुमच्यासाठी परफेक्ट ठरणार आहे. तुम्ही या ठिकाणी तुमच्या मित्रपरिवारासमवेत, कुटुंबासमवेत नक्कीच भेट देऊ शकता.
येथे तुम्हाला अनेक पुरातन मंदिरे, टेकड्या पाहायला मिळणार आहेत. विशेष म्हणजे येथील नयनरम्य निसर्ग तुमच्या मनाला खूपच आनंद देणारा ठरेल. हंपी हे शहर आपल्या नाईटलाईफ साठी देखील अलीकडे खूपच लोकप्रिय झाले आहे.
येथील डोंगर आणि दऱ्यांमध्ये वसलेले हंपी तुमचे लक्ष वेधून घेते. हंपीमध्ये गेल्यावर तुम्ही विरूपाक्ष मंदिर, विठ्ठल मंदिर, क्विन्स बाथ, मातंग हिल्स आणि लोटस पॅलेस इत्यादी ठिकाणांना भेट देऊ शकता. मार्च महिन्यात या ठिकाणी भेट दिल्यास तुमची ट्रीप निश्चितच मनोरंजक होणार आहे.
गोवा : भारतातील हे असे ठिकाण आहे जिथे संपूर्ण जगातील पर्यटक आवर्जून भेट देत असतात. गोव्याला भेट देणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. दररोज येथे पर्यटकांची मोठी वर्दळ पाहायला मिळते. गोव्यामध्ये फिरण्यासाठी अनेक पिकनिक स्पॉट आहेत.
अनेक धबधबे, पुरातन मंदिरे, बीच, कोकणासारखा सुंदर निसर्ग येथे तुम्हाला पाहायला मिळणार आहे. येथील नाईटलाइफ देखील विशेष लोकप्रिय आहे.
येथील समुद्रकिनाऱ्यांसोबत गोव्यामधील मंदिरे, चर्च आणि समुद्री किल्ल्यांना तुम्ही आवर्जून भेट दिली पाहिजे. येथील दूधसागर धबधबा, अंजुना बीच, वागेतोर बीच आणि बॅसिलिका ऑफ बॉम जीझस इत्यादी ठिकाण पर्यटकांमध्ये खूपच लोकप्रिय आहेत.