Pik Karj 2023 : राज्यात सध्या रब्बी हंगामाचे पीक अंतिम टप्प्यात आले असून काही ठिकाणी रब्बी हंगामातील पिकांची काढणी देखील सुरू झाली आहे. साहजिकच आता आगामी काही दिवसात शेतकरी बांधवांकडून पुढील हंगामासाठी तयारी केली जाणार आहे. दरम्यान आता धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी एक मोठी कामाची आणि अतिशय आनंदाची बातमी समोर येत आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पाच एप्रिल पासून पीक कर्ज वाटप करण्याचा निर्णय जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने घेतला आहे.
खरीप हंगामासाठी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माध्यमातून पाच एप्रिल पासूनच कर्ज शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिले जाणार आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय तांत्रिक समितीने कोणत्या पिकासाठी किती कर्ज मिळेल याची निश्चिती देखील केली आहे. यामुळे आता शेतकऱ्यांना पाच एप्रिल पासून विभंगामासाठी पीक कर्ज उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा झाल्याचे सांगितले जात आहे.
खरं पाहता जिल्हाधिकारी जलज शर्मा जिल्हास्तरीय तांत्रिक समितीची सभा घेण्यात आली होती. या सभेमध्ये पीक कर्ज दर निश्चित करण्यात आला आहे. म्हणजेच खरीप हंगामातील कोणत्या पिकांना बँकेकडून किती कर्ज मिळेल याची निश्चिती आता झाली आहे. विशेष म्हणजे याला बँकेच्या संचालक मंडळाकडून मान्यता देखील मिळाली आहे. दरम्यान आता आपण कोणत्या पिकासाठी किती कर्ज खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना उपलब्ध होईल याविषयी थोडक्यात जाणून घेऊया.
मिळालेल्या माहितीनुसार, खरीप हंगामात नंदुरबार आणि धुळे जिल्ह्यासाठी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माध्यमातून सोयाबीन पिकासाठी 50 हजार, जिरायत कपाशीसाठी 55000, बागायत कपाशीसाठी 75000, मिरचीसाठी 62,500, केळीसाठी एक लाख, केळी टिशू कल्चर साठी दीड लाख, पपईसाठी 87 हजार, पूर्व हंगामी उसासाठी एक लाख दहा हजार, रोप लागवडीसाठी सव्वा लाख, खोडव्यासाठी 85000 अशा पद्धतीने प्रति हेक्टर पीक कर्ज खरीप हंगामासाठी उपलब्ध होणार आहे.
या ठिकाणी धुळे आणि नंदुरबार या दोन्ही जिल्ह्यासाठी वर नमूद केल्याप्रमानेच पीक कर्ज उपलब्ध होणार आहे. विशेष म्हणजे पाच एप्रिल पासून पीक कर्ज वाटप सुरू होणार असल्याने 31 मार्चपर्यंत थकबाकीदार शेतकऱ्यांनी आपला भरणा करून घ्यावा अस आवाहन देखील या निमित्ताने संबंधितांकडून केल जात आहे. विशेष म्हणजे प्रथम कर्ज भरणा केलेल्या शेतकऱ्यांना प्रथम कर्ज उपलब्ध करून दिले जाईल असे देखील बँकेच्या संचालक मंडळाच्या माध्यमातून समोर येत आहे.