Pik Vima Nuksan Bharpai : शेतकरी बांधवांना नैसर्गिक आपत्तीमुळे कायमच मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागते. कधी अतिवृष्टी, कधी अवकाळी पाऊस, कधी गारपीट, कधी दुष्काळ तर कधी अधिक थंडी यामुळे देखील पिकांचे नुकसान होत असते. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना पीक विम्याचा फायदा मिळत असतो. दरम्यान आता जळगाव जिल्ह्यातून अशीच एक बातमी समोर आली आहे.
खरं पाहता जानेवारी महिन्याच्या सुरुवातीला अख्या जळगाव जिल्ह्यात प्रचंड प्रमाणात थंडी कोसळली. थंडीचा जोर इतका होता की केळीसमवेतच बहुतांशी फळ पिकांना फटका बसला. जानेवारी महिन्यातील एक दोन आणि तीन जानेवारीपर्यंत जिल्ह्यात आठ डिग्री सेल्सिअस पेक्षा कमी तापमानाची नोंद झाली. यामुळे जळगाव जिल्हा खानदेशाच काश्मीर म्हणून ओळखलं जाऊ लागलं.
यामुळे मात्र जिल्ह्यातील केळी उत्पादकांना मोठा फटका बसला. केळी पिकाचे अतोनात असे नुकसान झाले आहे. केळी उत्पादक बागायतदारांचे थंडीमुळे जे काही नुकसान झाले आहे ते भरून निघणार नाही मात्र नुकसान भरपाई म्हणून आता नुकसान झालेल्या केळी उत्पादकांना हेक्टरी 26,500 रुपये फळ पिक विम्याचा लाभ मिळणार असल्याची माहिती खासदार रक्षा खडसे यांनी दिली आहे.
खासदार रक्षा खडसे यांनी दिलेल्या बहुमूल्य अशा माहितीनुसार, पुर्नरचित हवामानावर आधारित फळपीक विमा योजना २०२२-२३ (आंबिया बहार) अंतर्गत दि.१३ जानेवारी २०२३ पर्यंतच्या महावेध माहिती (डेटा) नुसार जळगांव जिल्ह्यातील जवळपास ४९ महसूल मंडळात सलग ३ दिवस किमान तापमान ८ डिग्री सेल्सियस व त्यापेक्षा कमी राहिली आहे.
तापमानात झालेली घट पाहता जिल्ह्यातील थंडीचा अंदाज येतोचं. निश्चितच केळी पिकासाठी अधिकची थंडी घातक ठरते. अशा परिस्थितीत केळी पिकाचे या थंडीमुळे मोठे नुकसान. जिल्ह्यातील केळीला कमी तापमानाचा मोठा फटका बसला आहे. दरम्यान आता नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना रु.२६,५००/- प्रमाणे नुकसान भरपाई मंजुर होणार आहे.
या महसूल मंडळातील शेतकऱ्यांना मिळणार नुकसान भरपाई
भुसावळ तालुक्यातील पिंपळगांव महसूल मंडळात यामुळे नुकसान झाले आहे.
बोदवडमधील बोदवड, करंजी, नाडगांव या महसूल मंडळात नुकसान झालं आहे.
चोपडामधील अडावद, चोपडा, धानोरा, गोरगावले, हातेड या महसूल मंडळात कमी तापमानामुळे केळी पिकाचे नुकसान झाले आहे.
जामनेर मधील जामनेर, मालदाभाडी, नेरी या महसूल मंडळात नुकसान झाले.
मुक्ताईनगरमधील अंतुर्ली, घोडसगांव, कुऱ्हा या महसूल मंडळात अतोनात नुकसान केळी पिकाचे झाले.
रावेरमधील खानापूर, खिर्डी, खिरोदा, निंभोरा, रावेर, सावदा या महसूल मंडळात नुकसानीची नोंद झाली आहे.
यावल तालुक्यातील बामणोद, भालोद, फैजपूर, किनगांव, साखळी, यावल महसूल मंडळात नुकसान झालं आहे.
अमळनेर तालुका हा केळी उत्पादनासाठी विशेष ओळखला जातो. यातील अमळगाव, अमळनेर, भरवस, मारवड, नगाव, पातोंडा, शिरुड या महसूल मंडळात देखील यामुळे नुकसान झाले आहे.
भडगावमधील आमडदे, भडगाव, कजगांव, कोळगाव या महसूल मंडळात कमी तापमानामुळे केळी पिकाचे अतोनात नुकसान झाले.
चाळीसगावमधील बहाळ या मंडळात पण नुकसानीची तीव्रता अधिक होती.
धरणगावमधील चांदसर, पाळधी, पिंप्री, साळवा, सोनवद येथे पण अधिक नुकसान झाले.
एरंडोल मधील उत्रानलां पण नुकसान झाले.
जळगावमधील भोकर, म्हसावद, नशिराबाद, पिंप्राळा या महसूल मंडळात पण नुकसान नमूद करण्यात आले.
दरम्यान आता वर नमूद केलेल्या सर्व महसूल मंडळातील केळी उत्पादक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार आहे.