स्पेशल

Pm Kisan Yojana : पीएम किसान योजनेच्या नियमात झाला मोठा बदल ! जिल्हाधिकाऱ्यांनी दिली माहिती

Pm Kisan Yojana Rule Changed 2023 : भारत हा एक शेतीप्रधान देश आहे. अर्थातच देशात शेती हा मुख्य व्यवसाय आहे. देशातील जवळपास 60 ते 70 टक्के लोकसंख्या ही प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरीत्या शेती व्यवसायावर आधारित आहे. साहजिकच यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात भरीव वाढ गरजेचे आहे अन्यथा देशाची अर्थव्यवस्था कोलमडू शकते.

परिणामी, शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारण्यासाठी, त्यांना शेतीतून चांगली कमाई व्हावी या अनुषंगाने वेगवेगळ्या योजना शासनाच्या माध्यमातून चालवल्या जातात. या योजनेच्या माध्यमातून शासनाचा शेतकऱ्यांचे उत्पादन वाढवण्याचा मुख्य मानस असतो. पी एम किसान योजना ही देखील अशीच एक शासनाची महत्त्वाची योजना आहे. विशेष बाब म्हणजे दस्तूर खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वकांक्षी योजनेपैकी एक ही योजना असून या योजनेला प्रमोट करण्याचे काम केंद्र शासनाच्या माध्यमातून केले जात आहे.

हे पण वाचा :- महाराष्ट्रातील केशरी रेशनकार्डधारक लोकांना आता धान्याऐवजी पैसे मिळणार ! पण असा करावा लागणार अर्ज, नाहीतर…..

दरम्यान महाराष्ट्रात देखील केंद्राच्या या योजनेप्रमाणेच एक नवीन योजना सुरू करण्यात आले आहे. नमो शेतकरी योजना असे या योजनेचे नाव आहे. ज्या पद्धतीने पीएम किसान योजनेतून शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपये एकूण तीन हफ्त्यात दिले जातात. त्याच पद्धतीने नमो शेतकरी योजनेतून देखील शेतकऱ्यांना 6000 रुपये लाभ देणे प्रस्तावित आहे.

म्हणजेच आता राज्यातील शेतकऱ्यांना पीएम किसानचे सहा हजार आणि नमो शेतकऱ्याचे सहा हजार असे एकूण बारा हजार रुपये मिळणार आहेत. वास्तविक पीएम किसान ही योजना गरीब शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी सुरू करण्यात आलेली आहे. मात्र मध्यंतरी या योजनेचा अनेक अपात्र शेतकऱ्यांनी लाभ घेतला. ही एक निश्चितच गंभीर बाब होती. त्यामुळे शासनाने तात्काळ यावर कारवाई करण्याचा निर्णय घेतला.

याच पार्श्वभूमीवर केंद्र शासनाच्या माध्यमातून या योजनेच्या नियमात आता बदल करण्यात आले आहेत. या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी आता केवायसी बंधनकारक करण्यात आली आहे. याबाबत धुळ्याचे जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी माहिती दिली आहे. जिल्हाधिकारी महोदय यांनी दिलेल्या माहितीनुसार, पीएम किसान योजनेचा 14वा हप्ता जर पात्र शेतकऱ्यांना मिळवायचा असेल तर त्यांना केवायसी करणे बंधनकारक आहे.

हे पण वाचा :- शेतकऱ्यांनो सावधान ! ‘या’ तारखेला पुन्हा अवकाळी पाऊस बरसणार; पंजाबरावांचा अंदाज

धुळे जिल्ह्याच्या बाबतीत माहिती देताना त्यांनी सांगितले की, या योजनेसाठी आतापर्यंत धुळे जिल्ह्यातील 80 टक्के लाभार्थ्यांनी केवायसी ची प्रक्रिया पूर्ण केली आहे. उर्वरित 20 टक्के लाभार्थ्यांना देखील लवकरात लवकर हे काम करावे लागणार आहे. एकंदरीत जर शासनाच्या या महत्त्वाकांक्षी योजनेचा शेतकऱ्यांना लाभ घ्यायचा असेल तर नियमाचे पालन शेतकऱ्यांना करावे लागणार आहे. शेतकऱ्यांना केवायसी करावी लागणार आहे तसेच जमिनी संदर्भातील मालमत्तेची माहिती महसूल विभागाला द्यावी लागणार आहे.

अन्यथा शेतकऱ्यांना या योजनेपासून वंचित केले जाऊ शकते. दरम्यान जे शेतकरी पीएम किसान साठी पात्र ठरतील त्याच शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा लाभ दिला जाणार आहे. यामुळे वार्षिक 12,000 मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना केवायसी करणे गरजेचे आहे. शेतकरी केवायसीची प्रक्रिया आपल्या जवळील सीएसटी सेंटरवर भेट देऊन बायोमेट्रिक च्या माध्यमातून करू शकणार आहेत. या ठिकाणी नाममात्र शुल्क शेतकऱ्यांकडून घेतले जाईल.

हे पण वाचा :- दहावी, बारावी उत्तीर्ण तरुणांसाठी खुशखबर! विमानतळावर काम करण्याची सुवर्णसंधी; भारतीय विमान सेवांमध्ये ‘या’…

Ajay Patil

Published by
Ajay Patil

Recent Posts