Pm Kisan Yojana : शेतकरी कल्याणाचा वसा जोपासण्यासाठी विविध सरकारांनी त्यांच्या कार्यकाळात शेतकऱ्यांसाठी वेगवेगळ्या योजना जाहीर केल्या आहेत. यातील बहुतांशी योजना आजही सुरू आहेत. 2014 मध्ये सत्तेत आलेल्या मोदी सरकारने देखील शेतकऱ्यांसाठी अनेक कल्याणकारी योजना जाहीर केल्या आहेत.
पीएम किसान सन्मान निधी योजना ही देखील अशीच एक कल्याणकारी आणि केंद्रातील सरकारची एक महत्त्वाकांक्षी योजना आहे. दरम्यान, आता याच केंद्र पुरस्कृत योजने संदर्भात एक महत्त्वाची माहिती आली आहे.
या योजनेचा पुढील हप्ता लवकरच लाभार्थींच्या खात्यात जारी केला जाईल अशी अपेक्षा आहे. केंद्रीय क्षेत्रातील योजना पीएम किसानच्या 2,000 रुपयांच्या पुढील हप्त्याची शेतकरी आतुरतेने वाट पाहत आहेत. पीएम किसान योजनेअंतर्गत पात्र ठरणाऱ्या शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये दिले जातात.
लाभार्थ्यांना चार महिन्यांच्या अंतराने प्रत्येक वर्षी तीन हप्त्यांमध्ये 6 हजार रुपये दिले जात आहेत. अर्थातच दोन हजाराचा एक हप्ता याप्रमाणे या निधीचे वितरण केले जात आहे. या योजनेच्या पात्र लाभार्थ्यांना आतापर्यंत 17 हप्ते मिळाले आहेत.
मागील 17 वा हप्ता हा 18 जून 2024 ला पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात वर्ग करण्यात आला होता. दरम्यान, आता या योजनेच्या लाभार्थ्यांच्या माध्यमातून याचा अठरावा हप्ता कधीपर्यंत त्यांच्या खात्यात जमा होणार असा प्रश्न उपस्थित केला जातोय.
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी ही केंद्रीय क्षेत्र योजना आहे, ज्याचा उद्देश देशभरातील सर्व शेतीयोग्य जमीनधारक शेतकरी कुटुंबांना आर्थिक सहाय्य प्रदान करणे आहे. ही स्कीम फेब्रुवारी 2019 मध्ये लाँच करण्यात आली होती.
तेव्हापासून ही योजना अविरतपणे सुरू आहे. योजनेंतर्गत, सर्व जमीनधारक शेतकरी कुटुंबांना तीन समान हप्त्यांमध्ये प्रतिवर्ष 6000 रुपयांचे समर्थन दिले जाते. ही थेट लाभ हस्तांतरण योजना आहे त्यामुळे निधी थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात हस्तांतरित केला जाईल.
योजनेच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार मदतीसाठी पात्र असलेल्या शेतकरी कुटुंबांची ओळख पटवणे ही राज्य सरकार आणि केंद्रशासित प्रदेश प्रशासनाची जबाबदारी आहे. पीएम किसान योजनेचा 18वा हप्ता ऑक्टोबरमध्ये लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होणे अपेक्षित आहे.
विजयादशमीच्या मुहूर्तावर या योजनेचा हप्ता पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होण्याची दाट शक्यता आहे. याचा लाभ हा थेट लाभ हस्तांतरण (DBT) मोडद्वारे देशभरातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केला जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुढील हप्त्याचे वितरण केले जाणार आहे.