Poco X6 Pro : पोकोचा दमदार फोन भारतात धुमाकूळ घालण्यासाठी सज्ज झाला आहे. एका रिपोर्टनुसार हा ब्रँड लवकरच आपला एक्स 6 सीरिज स्मार्टफोन भारतात लाँच करणार आहे. हा स्मार्टफोन पोको X6 प्रो असेल.
एक्स 6 सीरिजचे फोन लवकरच भारतात लाँच होणार
बीआयएस लिस्टिंगने पुष्टी केली आहे की पोको एक्स 6 प्रो भारतात लाँच केला जाईल. पोको एक्स 6 प्रो हा रेडमी नोट 13 प्रोचा रिब्रँडेड व्हर्जन असेल, जो नुकताच चीनमध्ये लाँच करण्यात आला होता.
पोको एक्स 6 5G देखील लवकरच लाँच होण्याची शक्यता आहे. पोकोने अद्याप एक्स 6 सीरिजच्या लाँचिंगची तारीख जाहीर केलेली नाही, परंतु ते लवकरच लॉन्च होऊ शकते.
या स्मार्टफोनचे रिब्रँडेड व्हर्जन असेल
भारतात लाँच करण्यात आलेला पोको एक्स 6 प्रो हा रेडमी नोट 13 प्रो चा रिब्रँड व्हर्जन असेल, जो नुकताच चीनमध्ये लाँच करण्यात आला होता. त्यात काही बदल होऊ शकतात. पण अनेक फीचर्स सारखेच असतील असे म्हटले जात आहे.
रेडमी नोट 13 प्रो
रेडमी नोट 13 प्रो बद्दल बोलायचे झाले तर यात 6.7 इंचाचा एमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. यासोबत 12Hz रिफ्रेश रेट मिळतो. हा स्मार्टफोन स्नॅपड्रॅगन 7एस जेन 2 सह सुसज्ज आहे. मागील बाजूस 8 मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड अँगल आणि 200 मेगापिक्सल प्रायमरी सेन्सरसह 2 मेगापिक्सलचा मॅक्रो कॅमेरा आहे.
तर फ्रंटमध्ये 16 मेगापिक्सलचा कॅमेरा उपलब्ध आहे. या फोनमध्ये 5,000 एमएएच बॅटरीसह 67 वॉट चार्जिंग सपोर्ट आहे, जो 44 मिनिटांत फोन 100% चार्ज करतो.
स्मार्टफोनची क्रेझ
सध्या स्मार्टफोनची क्रेझ आहे. सध्या प्रत्येकाकडेच स्मार्टफोन असतोच. अनेकांकडंही नजर नवनव्या लॉन्च होणाऱ्या स्मार्टफोनकडे असते. त्यामुळे स्मार्टफोन शौकिनांसाठी हा नवा लॉन्च होणारा स्मार्टफोन फायदेशीर ठरू शकतो.