नोकरीच्या मागे न लागता आपल्या स्वतःच्या एखाद्या छोट्या-मोठ्या व्यवसायाची सुरुवात करून या व्यवसायाच्या माध्यमातून स्वतःची आर्थिक स्थितीत सुधारणा करणे खूप गरजेचे आहे. व्यवसाय म्हटले म्हणजे अगदी पाच ते दहा लाख रुपये गुंतवणूक करून व्यवसाय(Business) सुरू करता येतो असे नाही. व्यवसाय सुरू करताना सर्वप्रथम संबंधित व्यवसायाला बाजारपेठेत असलेली मागणी, त्याची गुंतवणूक(Investment) आणि तुमच्यात असलेले मार्केटिंग आणि इतर महत्त्वाचे गुण यांचा अभ्यास करणे खूप गरजेचे आहे.
तुमच्यात कष्ट करण्याची ताकद आणि व्यवसायाला पुढे नेण्याची जिद्द असेल तर अगदी छोट्याशा स्वरूपात केलेली व्यवसायाची सुरुवात देखील कालांतराने मोठी होऊ शकते. व्यवसायांची यादी पाहिली तर खूप सारे व्यवसाय आपल्याला सांगता येतील. परंतु व्यवसाय सुरू करण्यासाठी निवड करताना सगळ्यात अगोदर महत्त्वाचे म्हणजे आपली आर्थिक (Financial) क्षमता आणि त्या व्यवसायातून मिळणारा नफा याचा अभ्यास करणे गरजेचे आहे. बऱ्याच व्यक्ती कमीत कमी गुंतवणुकीतून जास्त नफा(Profit) देणाऱ्या व्यवसायांच्या शोधात असतात. त्यामुळे या लेखांमध्ये अगदी 20 ते 25 हजारामध्ये सुरू करता येईल अशा महत्त्वाच्या व्यवसायाची संपूर्ण माहिती आपण घेणार आहोत.
पोहे मॅन्युफॅक्चरिंग युनिट( पोहा बनवण्याचा व्यवसाय )
पोहे हे आपल्या सगळ्यांच्या परिचयाचे असून ग्रामीण भागापासून ते शहरी भागापर्यंत बऱ्याच घरांमध्ये सकाळच्या नाश्त्यासाठी पोह्याचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो. पोहे पौष्टिक तर असतेच परंतु पचायला देखील हलके असल्याने प्रत्येक घरात पोह्याला मोठ्या प्रमाणावर मागणी असते. त्यामुळे मागणीचा विचार केला तर पोहा बनवण्याचा व्यवसाय म्हणजेच पोहा मॅन्युफॅक्चरिंग युनिट उभारला तर नक्कीच या व्यवसायातून चांगला नफा मिळू शकतो.
या व्यवसायाबद्दल जर आपण खादी आणि ग्रामोद्योग आयोगाचा प्रकल्प(Project) अहवाल पाहिला तर पोहा मॅन्युफॅक्चरिंग युनिट ची किंमत दोन लाख 43 हजार रुपये असून या व्यवसायाकरिता तुम्हाला 90% पर्यंत कर्ज देखील मिळू शकते. म्हणजेच साधारणपणे वीस ते पंचवीस हजार रुपये या व्यवसायात गुंतवून आणि बाकीचे कर्ज स्वरूपात पैसे उभारून हा व्यवसाय सुरू करू शकतात.
पोहा मॅन्युफॅक्चरिंग
युनिट सुरू करण्यासाठी आवश्यक बाबीहा व्यवसाय सुरू करण्याकरता तुम्हाला साधारणपणे पाचशे चौरस फूट जागांची आवश्यकता असते. तसेच पोहे मशीन, तयार पोहे पॅकिंग करण्याकरता पॅकिंग मशीन तसेच भट्टी व इतर काही आवश्यक बाबी लागतात. खादी आणि ग्रामोद्योग आयोगाच्या प्रकल्प अहवालामध्ये नमूद केल्यानुसार या उद्योगाची सुरुवात करताना थोडासा कच्चामाल विकत घेऊन मोजक्या प्रमाणात सुरुवात करावी व नंतर जसा जसा तुमचा अनुभव आणि मार्केट कॅप्चर वाढेल त्याप्रमाणे व्यवसायात वाढ करावी.
या व्यवसायासाठी किती मिळू शकते कर्ज?
याबाबत खादी आणि ग्रामोद्योग आयोगाचा प्रोजेक्ट रिपोर्टचा विचार केला तर हा व्यवसाय सुरू करण्याकरिता खादी आणि ग्रामोद्योग रोजगार योजनेच्या माध्यमातून कर्जासाठी जर अर्ज केला तर या माध्यमातून 90% कर्जाची सुविधा मिळू शकते.
कशा पद्धतीचे आहे या व्यवसायातील नफ्याचे गणित?
तुम्ही तुमचा व्यवसाय सुरू केल्यानंतर सगळ्यात अगोदर कच्चा मालाची आवश्यकता असते. याकरिता तुम्हाला सहा लाख रुपये खर्च येणार आहे याव्यतिरिक्त पन्नास हजार रुपये खर्च करणे गरजेचे आहे. एवढ्या भांडवला मध्ये तुम्ही 1000 क्विंटल पोहे तयार करू शकतात व त्याच्या विक्रीतून तुम्ही दहा लाख रुपयांचे उत्पन्न मिळू शकतात. या आकडेवारीवरून लक्षात येते की अशा माध्यमातून तुम्ही एक लाख 40 हजार रुपयांचा नफा मिळवू शकतात.