Post Office Scheme : तुम्हालाही पोस्ट ऑफिसच्या बचत योजनेत गुंतवणूक करायची असेल तर आजची बातमी तुमच्याच कामाची आहे. खरेतर, भारतात आजही सुरक्षित गुंतवणुकीला विशेष महत्त्व आहे. नक्कीच गेल्या काही वर्षांमध्ये शेअर मार्केट आणि म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या वाढली आहे.
मात्र, निम्म्याहून अधिक जनता आजही गुंतवणुकीसाठी सुरक्षित पर्यायाचा विचार करते. आणि जेव्हाही सुरक्षित गुंतवणुकीचा विषय निघतो तेव्हा सहाजिकच पोस्ट ऑफिसच्या बचत योजना, पोस्ट ऑफिसची एफडी योजना,
पोस्ट ऑफिसची आरडी योजना, बँकेची एफडी योजना, सरकारकडून सुरू केल्या जाणाऱ्या पेन्शन योजना, बचत योजना, एलआयसीच्या पॉलिसीज यांचा सर्वप्रथम विचार होतो. दरम्यान, आज आपण पोस्ट ऑफिसच्या अशा एका बचत योजनेची माहिती पाहणार आहोत
ज्यामध्ये गुंतवणूक केल्यास गुंतवणूकदारांना चांगला परतावा मिळू शकणार आहे. फक्त 2,200 च्या गुंतवणुकीतून गुंतवणूकदाराला एक लाख 57 हजार रुपयांचा फंड मिळणार आहे.
कोणती आहे ती योजना?
आम्ही ज्या योजनेबाबत बोलत आहोत ती आहे पोस्ट ऑफिसची RD योजना. जर पोस्ट ऑफिसच्या पाच वर्षांच्या आरडी स्कीम मध्ये प्रत्येक महिन्याला एखाद्या गुंतवणूकदाराने 2,200 रुपयांची गुंतवणूक सुरू केली तर सदर गुंतवणूकदाराला पाच वर्षानंतर एक लाख 57 हजार चार रुपये मिळणार आहेत.
पोस्ट ऑफिसच्या आरडी स्कीम मध्ये प्रत्येक महिन्याला एक निश्चित रक्कम जमा केली जात असते. यावर पोस्ट ऑफिस कडून चांगले व्याज दिले जाते. सध्या पोस्ट ऑफिसच्या आरडी स्कीम मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना 6.7% व्याजदराने परतावा दिला जात असून तिमाही चक्रवाढ व्याज याचा देखील या गुंतवणूकदारांना फायदा मिळतोय.
यानुसार, जर एखाद्या गुंतवणूकदाराने पोस्ट ऑफिसच्या पाच वर्षांच्या आरडी स्कीम मध्ये प्रत्येक महिन्याला 2200 गुंतवले तर सदर व्यक्ती पाच वर्षाच्या कालावधीत एक लाख 32 हजार रुपये या योजनेत गुंतवणार आहे आणि त्याला या गुंतवणुकीवर 25 हजार चार रुपये व्याज म्हणून मिळणार आहेत. अशा तऱ्हेने, 2200 रुपयांची गुंतवणूक करून गुंतवणूकदाराला एक लाख 57 हजार 4 रुपये मिळतील.