Post Office Scheme : आपल्याकडे गुंतवणुकीला फार महत्त्व आहे. गुंतवणुकीसाठी सर्वसामान्यांकडे वेगवेगळे पर्याय उपलब्ध आहेत. पोस्ट ऑफिसच्या बचत योजना, बँकांच्या एफ डी योजना गुंतवणुकीसाठी सर्वोत्कृष्ट ठरतात. याचे कारण म्हणजे येथे गुंतवलेला पैसा वाया जात नाही.
पोस्टाच्या बचत योजना आणि बँकेची एफडी योजना सुरक्षित आहेत. दरम्यान जर तुम्हीही पोस्ट ऑफिसच्या बचत योजनेत गुंतवणूक करू इच्छित असाल तर आज आम्ही तुमच्यासाठी एक महत्त्वाची माहिती घेऊन आलो आहोत.
आज आम्ही तुम्हाला पोस्ट ऑफिसच्या अशा एका बचत योजनेची माहिती सांगणार आहोत ज्यामध्ये गुंतवणूक केल्यास तुम्हाला लाखों रुपये मिळणार आहेत. महाराष्ट्र राज्य सरकारने अलीकडेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे.
या अंतर्गत पात्र ठरणाऱ्या महिलांना दरमहा पंधराशे रुपये दिले जाणार आहेत. जर महिलांनी लाडक्या बहिणीचे हे पंधराशे रुपये आणि आपल्याकडील आणखी थोडीशी रक्कम पोस्ट ऑफिसच्या एका बचत योजनेत गुंतवली तर त्यांना अवघ्या काही महिन्यातच चांगला जबरदस्त परतावा मिळू शकणार आहे.
कोणती आहे ती योजना?
आम्ही ज्या योजनेबाबत बोलत आहोत ती आहे पोस्ट ऑफिसची आरडी स्कीम. या योजनेत तुम्हाला दरमहा एक ठराविक रक्कम गुंतवता येते. या योजनेत तुम्ही किमान शंभर रुपयांपासून गुंतवणूक करू शकतात हे विशेष. महत्त्वाचे म्हणजे येथे कमाल गुंतवणुकीची कोणतीच मर्यादा नाही.
म्हणजेच गुंतवणूकदाराला हवे तेवढे पैसे तो दरमहा या योजनेत गुंतवू शकतो. पोस्ट ऑफिसच्या आरडी स्कीम मध्ये गुंतवणूक केल्यास 6.70% या दराने व्याज मिळते. यावर चक्रवाढ व्याजाचा देखील फायदा मिळतो.
या योजनेत प्री-मॅच्युअर अकाउंट क्लोजर व लोन या सुविधा मिळतात. पोस्ट ऑफिसच्या आरडी स्कीम मध्ये पाच वर्षांसाठी तसेच दहा वर्षांसाठीही गुंतवणूक करता येते.
असं झालं तर अकाउंट बंद होणार
पोस्ट ऑफिसच्या आरडी स्कीम मध्ये जर सलग सहा महिने कोणी पैसे जमा केले नाहीत तर त्यांचे अकाउंट बंद होते. मात्र हप्ता थकला की त्यानंतर दोन महिन्यानंतर पैसे जमा करून हे अकाउंट चालू करता येते.
पण जर सलग सहा महिने पैसे जमा झाले नाही तर अकाउंट बंद होतं. तुम्हाला पोस्टाच्या आरडी योजनेत गुंतवणूक करायची असेल तर तुम्ही जवळच्या पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन या योजनेचा फॉर्म भरून गुंतवणूक सुरू करू शकता.
या योजनेसाठी अर्ज करताना तुम्हाला आधार कार्ड, पॅन कार्ड, मोबाइल नंबर, पत्त्याचा पुरावा, दोन पासपोर्ट साइझ फोटो सुद्धा द्यावे लागतात.
कसे मिळतील 3 लाख
तुम्ही पोस्टाच्या पाच वर्षांचा आरडी योजनेत जर प्रत्येक महिन्याला 4200 गुंतवले तर तुम्हाला दोन लाख 99 हजार 736 रुपये मिळणार आहे. म्हणजेचं जवळपास तीन लाख रुपये मिळतील.
यामध्ये तुमच्या गुंतवणुकीचा आणि व्याजेच्या रकमेचा समावेश आहे. यात तुमची गुंतवणूक 2 लाख 52 हजार रुपयांची राहणार आहे आणि उर्वरित पैसे हे व्याजाचे राहणार आहेत.