Post Office Scheme : जर तुम्ही ही नजीकच्या भविष्यात तुमच्या जवळील पैसे कुठे गुंतवण्याच्या तयारीत असाल तर तुमच्यासाठी आजचा लेख कामाचा ठरणार आहे. भारतात सुरक्षित गुंतवणुकीला विशेष महत्त्व आहे. सुरक्षित गुंतवणुकीसाठी बँकेच्या एफ डी योजना तसेच पोस्ट ऑफिस आणि एलआयसीच्या बचत योजनांमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक होताना दिसते.
दरम्यान आज आपण पोस्ट ऑफिसच्या अशाच एका बचत योजनेची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. या योजनेत गुंतवणूकदार एकदा आपले पैसे गुंतवून दरमहा एक फिक्स रक्कम व्याज म्हणून कमवू शकणार आहेत.
पोस्ट ऑफिसच्या या योजनेतून गुंतवणूकदारांना दरमहा 20 हजार 500 रुपयापर्यंतची रक्कम व्याज म्हणून मिळणार आहे. चला तर मग वेळ न दवडता जाणून घेऊया पोस्टाच्या या जबरदस्त योजनेविषयी सविस्तर माहिती.
कोणती आहे ती योजना?
आम्ही पोस्ट ऑफिसच्या ज्या योजनेबाबत बोलत आहोत त्या योजनेला सीनियर सिटीजन सेविंग स्कीम असे नाव देण्यात आले आहे. या योजनेत ज्येष्ठ नागरिकांना गुंतवणूक करता येते. या योजनेत गुंतवणूक करणाऱ्या नागरिकांना 8.2% या रेटने व्याज दिले जाते.
ही योजना पाच वर्ष कालावधीची आहे. महत्त्वाचे म्हणजे योजनेचे पाच वर्षे पूर्ण झाल्यानंतर पुन्हा एकदा याचा कालावधी वाढवता येतो. या योजनेत फक्त भारतीय नागरिक गुंतवणूक करू शकतात.
ज्या भारतीय नागरिकांचे वय 60 वर्षांपेक्षा अधिक आहे त्या लोकांना यामध्ये गुंतवणूक करता येते. आधी या योजनेत फक्त पंधरा लाख रुपयांपर्यंतची रक्कम गुंतवता येत होती मात्र आता कमाल गुंतवणुकीची मर्यादा 30 लाख रुपये एवढी करण्यात आली आहे.
जर एखाद्या ग्राहकाने यामध्ये तीस लाख रुपये गुंतवले तर त्याला प्रत्येक वर्षाला दोन लाख 46 हजार रुपये व्याज मिळणार आहे. म्हणजे सदर ग्राहकाला प्रत्येक महिन्याला वीस हजार पाचशे रुपये व्याज मिळणार आहे. मात्र या योजनेतून मिळणाऱ्या उत्पन्नावर टॅक्स भरावा लागतो याची नोंद घ्यावी.
नक्कीच रिटायरमेंट नंतर ज्या लोकांना फिक्स इन्कम हवी असते अशा लोकांसाठी ही योजना फायदेशीर ठरणार आहे. या योजनेत एकदा पैसे गुंतवलेत की तुम्हाला दरमहा एक निश्चित रक्कम मिळत राहणार आहे. यामुळे उतार वयात या योजनेचा नक्कीच मोठा फायदा होणार आहे.