Post Office Scheme News : भारतात फार आधीपासूनच सुरक्षित गुंतवणुकीला विशेष महत्त्व आहे. अनेक जण सुरक्षित गुंतवणुकीसाठी पोस्ट ऑफिसच्या बचत योजनांमध्ये आणि एलआयसीच्या पॉलिसीमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करताना दिसतात. काहीजण पोस्टाच्या बचत योजनांमध्ये वन टाइम इन्व्हेस्टमेंट करतात तर काही लोक टप्प्याटप्प्याने इन्वेस्टमेंट करतात.
जर तुम्हीही पोस्ट ऑफिसच्या एखाद्या बचत योजनेत टप्प्याटप्प्याने इन्व्हेस्टमेंट करण्याच्या तयारीत असाल तर आजची बातमी तुमच्यासाठी खास ठरणार आहे. कारण की आज आपण पोस्ट ऑफिसच्या आरडी योजनेची माहिती पाहणार आहोत. या योजनेत गुंतवणूकदारांना दरमहा एक ठराविक रक्कम गुंतवता येते.
यामुळे जर तुमच्याकडे सुरक्षित गुंतवणुकीसाठी एकाच वेळी मोठा पैसा उपलब्ध नसेल तर तुम्ही पोस्टाच्या या योजनेत दरमहा एक ठराविक रक्कम गुंतवून चांगला मोठा फंड तयार करू शकणार आहात. दरम्यान आज आपण पोस्ट ऑफिसच्या 60 महिन्यांच्या आरडी योजनेची माहिती पाहणार आहोत.
कशी आहे पोस्टाची 60 महिन्यांची आरडी योजना?
पोस्ट ऑफिसच्या 5 वर्षांच्या म्हणजेच 60 महिन्यांच्या आरडी योजनेत गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना सध्या 6.7% दराने (तिमाही चक्रवाढ) व्याज दिले जात आहे. परंतु या व्याजदरात एका ठराविक वेळेनंतर बदल होत असतो.
पण जर समजा सध्या जे दर लागू आहेत तेच दर आगामी 60 महिने म्हणजेच पाच वर्षे कायम राहिलेत आणि जर यामध्ये प्रतिमहा 4050 रुपयांची गुंतवणूक केली तर किती रिटर्न मिळणार याबाबतचे कॅल्क्युलेशन आता आपण समजून घेणार आहोत.
जर एखाद्या ग्राहकाने पोस्टाच्या पाच वर्षांच्या आरडी योजनेत दरमहा 4 हजार 50 रुपयांची गुंतवणूक केली तर त्याला मॅच्युरिटीवर म्हणजेच 60 महिन्यांचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर दोन लाख 89 हजार 27 रुपये मिळणार आहेत.
यामध्ये गुंतवणूकदाराची गुंतवणुकीची रक्कम दोन लाख 43 हजार रुपये एवढी राहणार आहे आणि उर्वरित म्हणजेच 46 हजार सत्तावीस रुपये हे व्याज राहणार आहे. म्हणजे छोटी गुंतवणूक करूनही ग्राहकांना मोठा फंड या ठिकाणी तयार करता येणार आहे.
नक्कीच जर तुम्हालाही दरमहा एक निश्चित रक्कम कुठेतरी इन्व्हेस्ट करायची असेल तर पोस्ट ऑफिस ची आरडी योजना तुमच्यासाठी एक बेस्ट ऑप्शन ठरणार आहे.
या योजनेत केलेली गुंतवणूक ही पूर्णपणे सुरक्षित असते आणि याचमुळे अनेकजण या ठिकाणी गुंतवणूक करतात. या योजनेची सर्वात मोठी विशेषता म्हणजे पाच वर्षांचा काळ पूर्ण झाल्यानंतर आणखी पाच वर्षांसाठी ही योजना एक्सटेंड करता येते.