स्पेशल

पोस्ट ऑफिसची भन्नाट योजना ! एकदा एवढी रक्कम गुंतवली की प्रत्येक महिन्याला 9 हजार रुपये मिळणार, वाचा संपूर्ण गणित

Post Office Scheme : भारतात गुंतवणुकीसाठी आजही मोठ्या प्रमाणात सुरक्षित गुंतवणुकीला प्राधान्य दाखवले जाते. सुरक्षित गुंतवणुकीसाठी अनेकजण पोस्ट ऑफिसच्या बचत योजनांमध्ये पैसा गुंतवतात. तुम्हालाही आगामी काळात पोस्ट ऑफिस च्या एखाद्या बचत योजनेत पैसा गुंतवायचा असेल तर तुमच्यासाठी आजची बातमी कामाची राहील.

कारण की आज आपण पोस्ट ऑफिसच्या एका लोकप्रिय बचत योजनेची माहिती जाणून घेणार आहोत. आज आपण ज्या बचत योजनेची माहिती पाहणार आहोत त्यामध्ये पैसा गुंतवल्यास गुंतवणूकदारांना प्रत्येक महिन्याला 9000 रुपये मिळणार आहेत.

आपण ज्या योजनेबाबत बोलत आहोत ती आहे पोस्ट ऑफिस ची मंथली इनकम स्कीम. पोस्ट ऑफिसच्या मंथली इनकम स्कीम मध्ये आतापर्यंत अनेक लोकांनी गुंतवणूक केली आहे. या गुंतवणूकदारांना चांगला परतावा सुद्धा मिळतोय. यामुळे या बचत योजनेत गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे.

कशी आहे पोस्ट ऑफिस ची मंथली इनकम स्कीम!

पोस्ट ऑफिसच्या मंथली इनकम स्कीम मध्ये किमान एक हजार रुपये गुंतवता येतात. या योजनेत सिंगल अकाउंट आणि जॉइंट अकाउंट ओपन करता येते. सिंगल अकाउंट ओपन करून गुंतवणूक सुरू केली तर गुंतवणूकदाराला कमाल नऊ लाख रुपये गुंतवता येतात आणि जॉइंट अकाउंट ओपन केल्यास गुंतवणूकदाराला 15 लाख रुपये गुंतवता येतात.

या योजनेच्या कालावधीबाबत बोलायचं झालं तर ही योजना पाच वर्षांसाठी ची आहे. सरकार वेळोवेळी या योजनेच्या व्याजदरात बदल करत असते. पण सध्या या योजनेमध्ये गुंतवणूक केलेल्या गुंतवणूकदारांना 7.4% या दराने परतावा दिला जातोय. अल्पवयीन बालकांना देखील यामध्ये गुंतवणूक करता येते मात्र ही गुंतवणूक अल्पवयीन बालकांच्या नावे पालकांना करावी लागते.

मात्र पोस्ट ऑफिस मंथली इन्कम योजनेतील गुंतवणूकदारांना जर योजनेचा कालावधी पूर्ण होण्याआधीच पैशांची गरज भासली आणि येथून पैसे काढावे लागलेत तर त्यांना दंड भरावा लागतो. या योजनेचा लॉक इन पिरेड हा एक वर्षाचा आहे म्हणजेच एक वर्षापर्यंत यातून पैसे काढता येत नाही.

मात्र एक वर्षाचा काळ पूर्ण झाला की यातून पैसे निघतात. एक वर्षानंतर पैसे काढायचे झाले तरी दंड भरावाच लागतो. गुंतवणूकदारांनी जर एक ते तीन वर्षात या योजनेतून पैसे काढले तर त्यांना त्यांच्या गुंतवणुकी पैकी दोन टक्के रक्कम दंड म्हणून भरावा लागतो तसेच जर तीन वर्षानंतर या योजनेतून पैसे काढले तर त्यांच्या गुंतवणुकीच्या 1% एवढी रक्कम दंड म्हणून द्यावी लागते.

कसे मिळणार महिन्याला 9 हजार रुपये ?

जर तुम्हाला या योजनेत गुंतवणूक करून महिन्याला 9000 रुपये कमवायचे असतील तर यासाठी तुम्हाला जॉइंट अकाउंट ओपन करावे लागणार आहे आणि यामध्ये कमाल 15 लाख रुपये गुंतवावे लागतील.

या योजनेत 15 लाख रुपये गुंतवल्यास पोस्ट ऑफिस कडून प्रत्येक महिन्याला 9250 रुपये व्याज म्हणून दिले जाणार आहेत. जर समजा एखाद्या गुंतवणूकदाराने सिंगल अकाउंट ओपन करून त्यात कमाल नऊ लाख रुपये गुंतवले तर अशा गुंतवणूकदाराला प्रत्येक महिन्याला 5 हजार 550 रुपये व्याज म्हणून मिळणार आहेत.

Tejas B Shelar

Based in Ahmednagar, Maharashtra, I Am a Founder Editor for Ahmednagarlive24, Covering Politics, Technology, Automobile, Finance, Investment and Share Market Related News. For News Tips, You Can Reach Me at edit.tejasbshelar@gmail.com

Published by
Tejas B Shelar

Recent Posts