स्पेशल

पुणे-अहमदनगर-औरंगाबाद महामार्गाबाबत मोठ अपडेट ! महामार्गासाठी केंद्र शासनाने काढलं राजपत्रक ; ‘या’ गावातून जाणार हा एक्सप्रेस वे

Pune Aurangabad Expressway : देशाच्या विकासाला चालना द्यायची असेल तर देशातील महामार्ग सर्वप्रथम अव्वल दर्जाची तयार करणे महत्त्वाचे आहे. कोणत्याही विकसित देशात त्या देशातील महामार्ग म्हणजेच दळणवळण व्यवस्था महत्त्वाची भूमिका बजावतात.

केंद्र शासनाने हीच बाब हेरून भारतमाला परियोजना आखली. या परियोजनेअंतर्गत देशभरात जवळपास तीन हजार किलोमीटर रस्त्यांचे एक मजबूत जाळे तयार केले जाणार आहे. यामध्ये महाराष्ट्रात देखील बहुतांशी महामार्ग तयार होणार आहेत. यामुळे निश्चितच महाराष्ट्राच्या विकासाला गती लाभणार आहे.

भारतमाला परियोजने अंतर्गत महाराष्ट्रात पुणे अहमदनगर औरंगाबाद या एक्सप्रेस वे चे देखील निर्माण केले जाणार आहे. हा महामार्ग महाराष्ट्रातील पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा या दोन विभागांना जोडणारा राहणार आहे. यामुळे राज्यातील कृषी क्षेत्राला तसेच उद्योग जगताला नवीन वळण लाभणार असून यामुळे पर्यटन देखील बळावणार आहे. दरम्यान आता या महामार्गाबाबत एक महत्त्वाच अपडेट हाती आल आहे.

या अपडेट मुळे सदर महामार्गाबाबत सुरू असलेला गदारोळ आता निकाली निघणार आहे. खरं पाहता केंद्र शासनाने या महामार्गासाठी एक राजपत्रक जारी केल आहे. या राजपत्रकमुळे आता सदर महामार्ग सध्या प्रस्तावित असलेल्या अलाइनमेंट ऑप्शन 3 नेच होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. यामध्ये थोड्याफार प्रमाणात चेंजेस झाले आहेत. मात्र महत्त्वाची बाब म्हणजे सध्या प्रस्तावित असलेल्या अलाइनमेंट ऑप्शन 3 नुसार सदर महामार्ग आता तयार केला जाणार आहे.

केंद्र शासनाने जारी केलेल्या शासन राजपत्रकात औरंगाबाद जिल्ह्यातील ज्या गावांमधून हा महामार्ग जाणार आहे त्या गावांची नावे नमूद करण्यात आली आहे. खरं पाहता याआधी पुणे जिल्ह्यातील जिल्हाधिकार्‍याकडून संबंधित गावांची नावे प्रकाशित करण्यात आली आहेत आणि तेथे भूसंपादनाची प्रक्रिया देखील स्टार्ट झाली आहे. आता औरंगाबाद जिल्ह्यातील औरंगाबाद आणि पैठण तालुक्यातील संबंधित महामार्गात येणाऱ्या गावांची नावे प्रकाशित करण्यात आली आहे.

या अनुसार औरंगाबाद तालुक्यातील 1) पिरवाडी 2) हिरापूर 3) सुंदरवाडी 4) झाल्टा 5) आडगाव बि. के 6) चिंचोली 7) घरदोन या गावातून तसेच पैठण तालुक्यातील 1) वरवंडी खुद्र 2) पारगाव 3) डोणगाव 4) बालानगर 5) कापुसवाडी 6) वडाळा 7) ववा 8) वरुडी बिके 9) पाचळगाव 10) नारायणगाव 11) करंजखेडा 12) आखदवाडा 13) वाघाडी 14) दडेगाव जहांगीर 15) पाटेगााँव 16) साईगांव 17) पैठण (MC-1) या गावातून हा महामार्ग जाणार आहे.

Ajay Patil

Published by
Ajay Patil

Recent Posts