Pune Aurangabad Expressway : पुणे ते छत्रपती संभाजीनगर हरित महामार्ग संदर्भात आत्ताच्या घडीची सर्वात मोठी अपडेट समोर आली आहे. खरे तर नुकत्याच दोन-तीन दिवसांपूर्वी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत या महामार्गाला मंजुरी प्रदान करण्यात आली आहे. मात्र सरकारने या महामार्गाच्या फक्त दोन टप्प्यांनाच मंजुरी दिली आहे. या महामार्गाचे काम एकूण तीन टप्प्यात होणार आहे. मात्र सरकारने याच्या दोनच टप्प्यांना मंजुरी दिली आहे.
छत्रपती संभाजीनगर ते पुणे हरित महामार्गापैकी छत्रपती संभाजी नगर ते शिरूर या दरम्यानच्या 205 किलोमीटर लांबीच्या मार्गाला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी मिळालेली आहे. यासाठी तब्बल 14,886 कोटी रुपयांचा खर्च केला जाणार आहे. राज्य सरकारने या महामार्गाच्या फेज एक आणि फेज दोन या दोन टप्प्यांनाच मंजुरी दिलेली आहे मात्र शिरूर ते पुणे या फेज तीनच्या टप्प्याला अजून मंजुरी मिळालेली नाही.
यामुळे या तिसऱ्या टप्प्याला राज्य सरकारकडून कधी मंजुरी मिळणार हा प्रश्न आहे. दरम्यान राज्य सरकारने मंजुरी दिलेल्या शिरूर ते छत्रपती संभाजीनगर या 205 किलोमीटर लांबीच्या मार्गासाठी 2633 हेक्टर जमिनीचे संपादन करावे लागणार आहे. या मार्गाचे काम बीओटी तत्त्वावर केले जाणार आहे. जेव्हा हा महामार्ग सुरू होईल तेव्हा त्यावर 2008 च्या कायद्यानुसार पथकर आकारला जाणार आहे.
खरंतर हा महामार्ग छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर आणि पुणे या तीन जिल्ह्यातून जाणार असून या महामार्गासाठी आवश्यक असणारे भूसंपादन या तिन्ही जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालय आणि एमएसआयडीसी यांच्या समन्वयाने केले जाणार आहे. महत्त्वाचे म्हणजे या मार्गाच्या कामाचे अध्यादेश पुढील आठवड्यात निर्गमित होण्याची शक्यता आहे.
हा मार्ग छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील पीरवाडी, हिरापूर, सुंदरवाडी, झाल्टा, आडगाव बुद्रुक, चिंचोली, घारदोन, तर पैठण तालुक्यातील वरवंडी खुर्द, पारगाव, डोणगाव, बालानगर, कापूसवाडी, वडाळा, बवा, वरुडी बुद्रुक, पाचळगाव, नारायणगाव, करंजखेडा, आखतवाडा, वाघाडी, दडेगाव जहाँगीर, पोटगाव, सायगाव, पैठण परिसरातून जाणार आहे. या मार्गाच्या अलाइनमेंट मध्ये बदल झालेला आहे. बिडकीनमध्ये अलायन्मेंट बदलण्यात आले आहे.
तिसऱ्या टप्प्याचे काम कधी सुरू होणार
छत्रपती संभाजीनगर ते पुणे हरित महामार्गाचे छत्रपती संभाजी नगर ते शिरूर या मार्गाच्या कामासाठी राज्य सरकारकडून मंजुरी मिळाली असून यासाठी 14886 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. पण शिरूर ते पुणे या मार्गाला कधी मंजुरी मिळणार असा प्रश्न उपस्थित केला जातो. खरे तर शिरूर ते पुणे हा महामार्ग विकसित करण्यासाठी दहा हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.
म्हणजेच संपूर्ण छत्रपती संभाजीनगर ते पुणे हा हरित महामार्ग विकसित करण्यासाठी जवळपास 25 हजार कोटी रुपयांचा खर्च लागणार आहे. सध्या राज्य शासनाने या महामार्गाच्या दोन टप्प्यांना मंजुरी दिली आहे. आगामी काळात या महामार्गाच्या तिसऱ्या टप्प्याला देखील मंजुरी मिळणार असून शिरूर ते पुणे दरम्यानही हरित महामार्ग विकसित होणार आहे.