स्पेशल

पुणे – छत्रपती संभाजीनगर ग्रीनफिल्ड महामार्गाचे काम कुठवर पोहोचलय ? नितीन गडकरींनी केली होती घोषणा

Pune – Aurangabad Greenfield Expressway : गेल्या काही वर्षांमध्ये आपल्या राज्यात हजारो किलोमीटर लांबीच्या रस्त्यांची कामे पूर्ण झाली आहेत. यामुळे राज्यातील रस्ते वाहतूक व्यवस्था आधीच्या तुलनेत अधिक मजबूत झाली आहे. पण, पुणे ते छत्रपती संभाजी नगर हा प्रवास करायचा म्हटला म्हणजे अंगाला काटाचं येतो.

महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी पुणे अन मराठवाड्याच प्रमुख केंद्र छत्रपती संभाजी नगर यादरम्यान रोजाना हजारोंच्या संख्येने प्रवासी प्रवास करतात. परंतु सध्याच्या महामार्गाची अवस्था फारच बिकट बनली आहे.

शिरूर पासून ते छत्रपती संभाजी नगर पर्यंत रस्त्यावर खड्डा पडलाय की खड्ड्यात रस्ता आहे हेच समजतं नाही. रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. कधीकाळी पुणे ते छत्रपती संभाजी नगर हा प्रवास अवघ्या पाच तासात पूर्ण होत होता.

पण आता रस्त्याची ही दुरावस्था पाहता या प्रवासासाठी प्रवाशांना सात तासाहून अधिकचा वेळ खर्च करावा लागतोय. रस्त्यांवर पडलेले खड्डे आणि त्यामुळे होणारी वाहतूक कोंडी यामुळे प्रवाशांची कोंडी होत आहे. सोबतच रस्त्यांची ही दुरावस्था पाहता अपघातांची भीती देखील असते.

याच सर्व पार्श्वभूमीवर केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी पुणे ते छत्रपती संभाजीनगर दरम्यान नवीन ग्रीनफिल्ड एक्सप्रेस वे तयार होणार अशी घोषणा केली आहे. सध्याचा चार पदरी महामार्ग हा पूर्णपणे खराब झाला आहे.

सध्याचा मार्ग हा पुणे ते शिरूर, शिरूर ते नगर आणि नगर ते छत्रपती संभाजी नगर असा आहे. यातील पुणे ते शिरूर हा चौपदरी टॉप क्लास आहे. यावरून जलद गतीने वाहतूक सुरु आहे. परंतु शिरूर ते छत्रपती संभाजीनगर दरम्यान चा मार्ग खराब झाला आहे.

यामुळे या दोन्ही शहरादरम्यान प्रवासासाठी कधी-कधी आठ तासाहून अधिकचा वेळ लागतोय. पण आता केंद्रातील सरकारने नवीन ग्रीनफिल्ड एक्सप्रेस वे ची घोषणा केली आहे. हा महामार्ग प्रकल्प पूर्ण झाल्यास दोन्ही शहरादरम्यानचा प्रवास अवघ्या अडीच तासात पूर्ण होणार असा दावा होत आहे.

पण, या महामार्गाची घोषणा होऊन आता बरेच दिवस उलटले आहेत तरीही याच्या सर्वेक्षणाबाबत कोणत्याही हालचाली होत नसल्याचे दिसत आहे. यामुळे या महामार्गासाठी ची प्रक्रिया कधीपासून सुरू होणार असा सवाल येथील नागरिकांच्या माध्यमातून उपस्थित केला जातोय.

एकंदरीत घोषणा झाल्यानंतर या महामार्ग संदर्भात कोणतीच हालचाल झालेली नाही, पण आगामी काळात या महामार्गासाठी सर्वेक्षण केले जाईल आणि त्यानंतर याच संरेखन अन डीपीआर रेडी होईल अशी आशा आहे.

संरेखन अन डीपीआर रेडी झाल्यानंतर मग या रस्त्यासाठी भूसंपादन केले जाईल. भूसंपादनानंतर या रस्त्यासाठी टेंडर काढले जाईल आणि मग जी कंपनी टेंडर घेईल त्या कंपनीकडे या प्रकल्पाचे काम सुपूर्द होईल.

Tejas B Shelar

Based in Ahmednagar, Maharashtra, I Am a Founder Editor for Ahmednagarlive24, Covering Politics, Technology, Automobile, Finance, Investment and Share Market Related News. For News Tips, You Can Reach Me at edit.tejasbshelar@gmail.com

Published by
Tejas B Shelar

Recent Posts