Pune Breaking : पुणे शिक्षणाचे माहेरघर. मात्र पुण्याची ही ओळख असली तरी अलीकडे वाहतूक कोंडी साठी पुणे ओळखले जाऊ लागले आहे. त्यामुळे शिक्षणाच्या माहेरघरात जीव गुदमरत असल्याचे चित्र आहे. राजधानी मुंबई प्रमाणेच पुण्यातही दिवसेंदिवस लोकसंख्या वाढत असून वाहनांची संख्या ही आकाशाला गवसनी घालत आहे. परिणामी पुणे शहरात वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे.
यामुळे पुणे शहरात राहणाऱ्या चाकरमान्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. दरम्यान आता पुणे शहरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी महापालिकाने एक मास्टर प्लॅन तयार केला आहे. महापालिका आयुक्त विक्रमकुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार पुणे शहरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी पालिकाच्या वतीने पुणे शहरात एकूण 21 ठिकाणी उड्डाणपुले आणि भुयारी मार्ग विकसित केले जाणार आहेत.
त्यासाठीचा आवश्यक डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट म्हणजेच डी पी आर तयार करण्यासाठी सल्लागार नेमण्यात येणार असल्याची माहिती देखील आयुक्तांनी दिली. दरम्यान हाती आलेल्या माहितीनुसार, 21 उड्डाणपुले आणि भुयारी मार्ग विकसित करण्यासाठी प्राथमिक जागा निश्चित झाली आहे. विशेष बाब अशी की यावर महापालिकाकडून पूर्वी देखील विचार झाला होता मात्र निधी अभावी याकडे दुर्लक्ष केले जात होते.
मात्र आता राज्य शासनाने निधी देण्यासाठी होकार दर्शवला असल्याने या कामाला गती लाभणार असून आता पुणे शहरात 21 ठिकाणी भुयारी मार्ग आणि उड्डाणपुले उभारण्यासाठी डीपीआर तयार करण्याचे काम लवकरच सुरू होणार असल्याचे चित्र आहे.
एका मीडिया रिपोर्टवर जर विश्वास ठेवला तर हे 21 उड्डाणपुले अन भुयारी मार्ग अशा ठिकाणी विकसित केले जाणार आहेत ज्या ठिकाणी जागेच भूसंपादन करावे लागणार नाही. किंवा ज्या ठिकाणी थोडेफार भूसंपादन करावे लागेल अशा ठिकाणीचं उड्डाणपुले आणि भुयारी मार्ग विकसित होणार आहेत. महापालिकेच्या प्राथमिक अभ्यासानुसार 21 पैकी 16 अशी ठिकाणी आहेत ज्या ठिकाणी भूसंपादन करण्याची आवश्यकता नाही. पाच ठिकाणी मात्र थोड्याफार प्रमाणात भूसंपादन पालिकेला करावे लागणार आहे.
या ठिकाणी होणार उड्डाणपूल किंवा भुयारी मार्ग
संगमवाडी बिंदूमाधव ठाकरे चौक
येरवडा आंबेडकर चौकात
विश्रांतवाडी चौक
सोलापूर रस्त्यावर काळूबाई चौक
पुणे विद्यापीठ चौक
हरेकृष्ण मंदिर
सिमला ऑफिस चौक
मुंढवा चौक
दांडेकर पूल
घोरपडी रेल्वे क्रॉसिंग
ससाणेनगर
या ठिकाणी होणार फक्त उड्डाणपूल
मुंढवा ताडीगुत्ता चौक ते वडगावशेरी
कोरेगाव पार्क ते कल्याणीनगर
पानमळा येथून कर्वे रोड व सिंहगड रोड
पुणे स्टेशन व संगमवाडी-लुंबिनीनगर
साधू वासवानी चौक