Pune District Metro News : महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी पुणे शहरात गेल्या काही वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीची समस्या पाहायला मिळत आहे. वाहतूक कोंडीच्या समस्यामुळे शहरातील नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय. यामुळे शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न निकाली काढण्यासाठी शासन आणि प्रशासनाच्या माध्यमातून शहरात मेट्रोचे जाळे विस्तारले जात आहे.
शहरात सध्या पिंपरी चिंचवड महापालिका ते स्वारगेट यापैकी पिंपरी चिंचवड महापालिका ते सिविल कोर्ट आणि वनाज ते रामवाडी या मार्गांवर मेट्रो सुरू आहे. विशेष म्हणजे शहरातील या मेट्रो मार्गांचा विस्तार देखील केला जाणार आहे.
तसेच इतरही अनेक महत्त्वाच्या मार्गांवर मेट्रोचे जाळे भविष्यात तयार होणार आहे. यामुळे शहरातील नागरिकांचा वाहतूक कोंडीचा प्रश्न कायमचा निकाली निघणार असा विश्वास तज्ञांनी व्यक्त केला आहे आहे.
दरम्यान पुण्यातील मेट्रो संदर्भात राज्याचे उपमुख्यमंत्री तसेच अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी मोठी माहिती दिली आहे. उपमुख्यमंत्री महोदय यांनी नुकत्याच दोन दिवसांपूर्वी सिंहगड रस्ता येथील राजाराम पूल चौकातील उड्डाण पुलाच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण केले होते.
याप्रसंगी बोलताना अजितदादांनी पुण्यातील मेट्रोबाबत एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी घोषणा केली आहे. याप्रसंगी बोलताना अजितदादांनी नागरिकांना या पुलाच्या रूपाने वाहतूक कोंडीतून काही प्रमाणात दिलासा मिळणार असे म्हटले आहे.
तसेच, या पुलाच्या रूपाने पुणेकरांना स्वातंत्र्य दिनाची आगळीवेगळी भेट मिळाली आहे, भविष्यात पुणे शहरच नव्हे तर पुणे जिल्ह्यातही मेट्रोचे जाळे विणले जाणार असे आश्वासन राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिले आहे.
एकंदरीत भविष्यात पुणे शहरात तर मेट्रोचे जाळे मोठ्या प्रमाणात विणले जाणारच आहे सोबतच जिल्ह्यातही मेट्रो धावणार आहे. यामुळे पुणे शहरासोबतच जिल्ह्यातील नागरिकांचा प्रवास आधीच्या तुलनेत अधिक जलद आणि सुरक्षित होईल असा विश्वास व्यक्त होत आहे.
नक्कीच जर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितल्याप्रमाणे भविष्यात पुणे जिल्ह्यातही मेट्रोचे जाळे तयार झाले तर यामुळे जिल्ह्याचा एकात्मिक विकास निश्चित होणार आहे. तथापि या संदर्भात आगामी काळात खरंच काही निर्णय घेतला जाणार का हे पाहणे विशेष उत्सुकतेचे ठरणार आहे.