Pune Metro News : पुणे शहरातील नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी हाती आली आहे. ही बातमी आहे मेट्रो संदर्भात. खरे तर सध्या पुण्यातील दोन महत्त्वाच्या मार्गांवर मेट्रो सुरु आहे. पिंपरी चिंचवड महापालिका ते सिविल कोर्ट आणि वनाज ते रामवाडी या मार्गांवर मेट्रो धावत आहे.
या दोन्ही मेट्रो मार्गांचे काम महा मेट्रोच्या माध्यमातून पूर्ण करण्यात आले आहे. दुसरीकडे पुण्याचा आयटी हब अर्थातच हिंजवडी परिसर शहराच्या मध्यवर्ती भागाला जोडणाऱ्या मेट्रो मार्गाचे काम देखील युद्ध पातळीवर सुरू आहे.
या मेट्रो मार्गाचे काम पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून पीपीपी तत्त्वावर पूर्ण केले जात आहे. दरम्यान याच शहरातील महत्त्वाकांक्षी मेट्रो मार्ग संदर्भात एक मोठी अपडेट हाती आली असून लवकरच हा मार्ग पुणेकरांच्या सेवेत दाखल होणार असे खात्रीलायक वृत्त आहे.
मिळालेल्या माहितीनुसार हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो मार्गाचे काम 70 टक्के पूर्ण झाले असून मार्च 2025 मध्ये हा मार्ग प्रवाशांच्या सेवेत येईल. यामुळे हिंजवडी येथे कामानिमित्त जाणाऱ्या हजारो नागरिकांना या मार्गाचा फायदा होईल आणि त्यांचा प्रवास सुरक्षितता जलद होईल अशी आशा आहे.
हिंजवडी येथे देशातील नामांकित आयटी कंपन्यांनी आपले बस्तान बसवलेले आहे. या भागाला पुण्याचे आयटी हब म्हणतात. या ठिकाणी कामानिमित्त असंख्य कर्मचारी खाजगी वाहनाने तसेच कंपनीच्या वाहनांनी प्रवास करतात.
मात्र या कर्मचाऱ्यांना ये-जा करताना वाहतूक कोंडीचा मोठा फटका बसतो. कर्मचाऱ्यांचा बहुमूल्य वेळ यामुळे वाया जातो. पण जेव्हा हिंजवडी ते शिवाजीनगर हा मेट्रोमार्ग सुरू होईल तेव्हा हिंजवडी ला जाणे सोयीचे होणार आहे.
खरे तर शिवाजीनगरच्या मध्यवर्ती केंद्राशी जोडणाऱ्या पुणे मेट्रोलाइन 3 प्रकल्पाचे अर्थातच हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो मार्गाचे बांधकाम वेगाने पुढे सरकत आहे. आतापर्यंत 70% हून अधिक काम पूर्ण झाले आहे.
हिंजवडी ते शिवाजीनगर मार्गावरील पुणे मेट्रोलाइन 3 चे काम पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातर्फे (पीएमआरडीए) सार्वजनिक खासगी भागीदारी (पीपीपी) तत्त्वावर टाटा समूहाने हाती घेतले असून, त्याच्या कार्यान्वनासाठी पुणे आयटी सिटी मेट्रो रेल लिमिटेड या स्पेशल पर्पज व्हेईकल (एसपीव्ही) कंपनीची स्थापना करण्यात आली आहे.
त्यामार्फत सध्या या प्रकल्पाचे काम सुरू आहे. आता या प्रकल्पाचे काम मार्च 2025 पर्यंत पूर्ण होईल आणि त्यानंतर या मार्गावर मेट्रो धावेल अशी माहिती हाती येत आहे. अर्थातच नवीन सरकार स्थापित झाल्यानंतर या मार्गावर मेट्रो सुरु होऊन पुणेकरांना दिलासा मिळेल.