Pune Metro News : पुणे शहरातील वाहतूक कोंडीची समस्या कायमची निकाली निघाली यासाठी शासन आणि प्रशासनाच्या माध्यमातून गेल्या काही वर्षांमध्ये युद्धपातळीवर प्रयत्न केले जात आहेत. या प्रयत्नांना काही प्रमाणात यश सुद्धा मिळाले आहे हे विशेष. वाहतूक कोंडी फोडण्याच्या उद्देशाने पुण्यात मेट्रोचे जाळे विस्तारण्यात आले आहे.
सध्या स्थितीला पिंपरी चिंचवड महापालिका ते सिविल कोर्ट आणि वनाज ते रामवाडी या दरम्यान मेट्रो सुरू आहे. खरे तर पिंपरी चिंचवड महापालिका ते स्वारगेट यादरम्यान मेट्रोमार्ग प्रस्तावित आहे.
अर्थातच या मार्गावरील सिव्हिल कोर्ट ते स्वारगेट हा टप्पा अजून वाहतुकीसाठी सुरू झालेला नाही. मात्र लवकरच सिविल कोर्ट ते स्वारगेट हा मार्ग पुणेकरांच्या सेवेत दाखल होणार आहे.
हा पुण्यातील पहिला भूमिगत मेट्रो मार्ग प्रकल्प असून याचे उद्घाटन स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. 26 सप्टेंबरला या अंडरग्राउंड मेट्रो मार्गाचे उद्घाटन होणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार 26 सप्टेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्यातील पहिल्या भूमिगत मेट्रो मार्गाचे उद्घाटन तर करणारच आहेत शिवाय दोन महत्त्वाच्या प्रकल्पांची पायाभरणी करणार आहेत.
स्वारगेट ते कात्रज मेट्रो मार्गाचा विस्तार आणि पिंपरी चिंचवड ते निगडी एलिव्हेटेड कॉरिडोर या दोन्ही प्रकल्पाचे भूमिपूजन यावेळी पंतप्रधानांच्या हस्ते होणार अशी शक्यता आहे. स्वतः राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि वर्तमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही माहिती दिली आहे.
दरम्यान आज आपण पुणेकरांच्या सेवेत सिविल कोर्ट ते स्वारगेट दरम्यानचा भूमिगत मेट्रो मार्ग दाखल झाल्यानंतर सिव्हिल कोर्ट अर्थातच जिल्हा न्यायालय ते स्वारगेट दरम्यान चा प्रवास किती मिनिटात होणार यासंदर्भात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
सिव्हिल कोर्ट ते स्वारगेट प्रवास किती मिनिटात
दिवाणी न्यायालय ते स्वारगेट या मेट्रो मार्गाचे काम जवळपास पूर्ण झाले असून फक्त काही तांत्रिक परवानग्या घेणे बाकी आहे. या परवानग्या लवकरच घेतल्या जाणार आहेत. मग हा भूमिगत मेट्रो मार्ग सव्वीस तारखेपासून पुणेकरांच्या सेवेत येणार आहे. या मार्गावरील मेट्रो ट्रेन ही एसी म्हणजे वातानुकूलित राहणार आहे. तसेच मेट्रोची रचना प्रवाशांना केंद्रस्थानी ठेवून करण्यात आली आहे.
आता सर्वात महत्त्वाचा आणि मोठा प्रश्न म्हणजे जेव्हा हा मेट्रो मार्ग प्रवाशांच्या सेवेत दाखल होईल तेव्हा सिविल कोर्ट ते स्वारगेट हा प्रवास किती मिनिटात पूर्ण होणार? तर आम्ही आपणास सांगू इच्छितो की या भूमिगत मेट्रो मार्गामुळे दिवाणी न्यायालय आणि स्वारगेट दरम्यानचा प्रवास फक्त अन फक्त 10-12 मिनिटांत पूर्ण होणार अशी अपेक्षा ठेवण्यात आली आहे. त्यामुळे दैनंदिन प्रवाशांसाठी हा एक सोयीस्कर पर्याय ठरणार असे दिसत आहे.