Pune Metro News :- पुणे शहरातील वाहतुकीच्या दृष्टिकोनातून अनेक प्रकल्प उभारले जात असून त्यातील पुणे मेट्रो हा प्रकल्प खूप महत्त्वाचा आहे. पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्याच्या दृष्टिकोनातून या प्रकल्पांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. याच अनुषंगाने नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुण्यातील विस्तारित मेट्रो मार्गाचे उद्घाटन केले. आता या नवीन मार्गावर देखील मेट्रो धावू लागली असून प्रवाशांच्या दृष्टिकोनातून अनेक महत्त्वपूर्ण सुविधा देखील उभारण्यात आलेल्या आहेत.
आपल्याला माहित आहेस की जर आपल्याला ट्रेनने प्रवास करायचा असेल तर आपल्याला तिकीट जवळ रांगेत थांबून तिकीट घ्यायला लागते. परंतु आता पुणे मेट्रोने
जर तुम्हाला प्रवास करायचा असेल तर प्रवाशांना तिकीट खिडक्यांवर थांबण्याची गरज भासणार नाही. कारण आता प्रवाशांकरिता ‘पुणे वन कार्ड’ हे प्रीपेड कार्ड उपलब्ध करून देण्यात आलेले आहे.पुणे वन कार्डचे महत्व
मेट्रोने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आता तिकीट खिडक्यांवर थांबण्याची गरज नसून त्याकरिता आता पुणे वन कार्ड हे उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. कार्डचा वापर हा मेट्रो सिस्टमवर केला जाणे शक्य असून येणाऱ्या कालावधीमध्ये पुणे मेट्रोपॉलिटन ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन अर्थात पीएमपीएल बसेस चा समावेश देखील यामध्ये करता यावा याकरिता या पुणे वन कार्डची कार्यक्षमता वाढवण्याची देखील योजना तयार करण्यात आली आहे.
पुणे मेट्रोने पुणे वन कार्ड सुरू करून या उपक्रमाची यशस्वीपणे सुरुवात केली आहे. जर पीएमपी बसेस मध्ये या कार्डचा वापर घडवला तर त्या कार्डची उपयुक्तता देखील वाढण्यास मदत होणार आहे व इतकेच नाही तर येणाऱ्या कालावधीत देशातील इतर शहरांमध्ये देखील हे कार्ड वापरता येणार आहे.
पुणे मेट्रो सकाळी सहा पासून धावणार?
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शनिवारी रुबी हॉल ते वनाज असा मेट्रोने प्रवास केला व प्रवाशांशी संवाद साधला. या संवादा दरम्यान अनेक प्रवाशांनी मेट्रो सकाळी सहा वाजता सुरू व्हावी अशी इच्छा बोलून दाखवली. त्यामुळे अजित पवार यांनी मेट्रोच्या अधिकाऱ्यांना त्यानुसार सेवा सुरू होण्याची वेळ समायोजित करण्याची विनंती देखील केली आहे.
तसेच जर आपण पुण्यातील बऱ्याच नागरिकांचा विचार केला तर ते अनेक कामानिमित्त मुंबईला दररोज प्रवास करतात व हा प्रवास डेक्कन क्वीन च्या माध्यमातून केला जातो. त्यामुळे डेक्कन क्वीनच्या वेळेवर रेल्वे स्टेशनवर पोहोचता यावे याकरिता मेट्रोने सकाळी सहा वाजता सुरूवात करावी अशा पद्धतीची भूमिका पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी देखील मांडली आहे.